शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात अकरावीच्या प्रवेशासाठी २४ हजार जागा ; कनिष्ठ महाविद्यालयांना १५ जुलैपर्यंत नोंदणीची मूदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:16 IST

अकरावीची प्रवेशप्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. शहरातील  ५९ उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुमारे २३ हजार ९६० जागा उपलब्ध आहे. या प्रवेश क्षमतेत झालेला बदल नोंदविण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून  ही प्रक्रिया पूर्ण होताच विद्यार्थ्यांना १५ जुलैपासून आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्देअकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रियामहाविद्यालयांना 15 जुलैपर्यंत नोंदणीची मूदत

नाशिक : कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबले असून, त्यामुळे पुढील प्रभावीत झालेली अकरावीची प्रवेशप्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. शहरातील  ५९ उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुमारे २३ हजार ९६० जागा उपलब्ध आहे. या प्रवेश क्षमतेत झालेला बदल नोंदविण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून  ही प्रक्रिया पूर्ण होताच विद्यार्थ्यांना १५ जुलैपासून आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, गतवर्षी नाशिकमध्ये २३ हजार ९६ जागांपैकी केवळ १९ हजार २३८ जागांवरच प्रवेश होऊ शकले होते. तर जवळपास ४ हजार ७२२ जागां रिक्त राहिल्या होत्या.शिक्षण विभागाने टप्प्याटप्याने शैक्षणिक कामकाज रुळावर आणण्यासाठी अकरावी प्रवेशप्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १५ जुलैपासून आॅनलाइन अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. त्यापूर्वी १५ जुलैपर्यंत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे. संबंधित मुख्याध्यापक तथा प्राचार्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, १६ जुलैपर्यंत नोंदणीकृत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती तपासून अंतिम करण्यात येणार आहे, तर विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने १५ जुलैपासून दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे व माहिती मान्यतेसाठी शाळा अथवा मार्गदर्शन केंद्राची निवड करणे, अर्जाला मान्यता मिळल्याची खात्री करणे आदी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.   निकालानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार असून, त्यात महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवून संकेतस्थळावर अंतिम अर्ज सादर करता येणार आहे. दरम्यान, यावर्षी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेर होणार नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  दरम्यान, गतवर्षी एकीककडे शहरातील विविध शाळां-महाविद्यालयांमध्ये  ४ हजार ७२२  जागा रिक्त राहिल्या होत्या. तर दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वारंवार फेºयांमध्ये सहभाग घ्यावाला लागला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालये निवडताना संभ्रमित न राहाता प्रवेश कोणत्या महाविद्यालयात घ्यायचा याचा निर्णय घेऊनच पर्याय निवडण्याची गरज आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीSchoolशाळाcollegeमहाविद्यालय