धरणात २४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:04 AM2018-06-20T01:04:01+5:302018-06-20T01:04:01+5:30

नाशिक : जूनचे वीस दिवस पूर्ण होत असले तरी अद्याप शहर व परिसरात पावसाची दमदार सुरुवात झाली नसल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले आहे. मान्सूनपूर्व पावसासह मान्सूनच्या पावसानेही अद्याप नाशिककरांची निराशा केली. गंगापूर धरणामधील जलसाठाही कमी होऊ लागला आहे. पाण्याची पातळी २४ टक्क्यांपर्यंत येऊन पोहचली आहे.

24 percent water storage in dam | धरणात २४ टक्के जलसाठा

धरणात २४ टक्के जलसाठा

Next
ठळक मुद्देपावसाची ओढ बळीराजासह सर्वच चिंतातुर

नाशिक : जूनचे वीस दिवस पूर्ण होत असले तरी अद्याप शहर व परिसरात पावसाची दमदार सुरुवात झाली नसल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले आहे. मान्सूनपूर्व पावसासह मान्सूनच्या पावसानेही अद्याप नाशिककरांची निराशा केली. गंगापूर धरणामधील जलसाठाही कमी होऊ लागला आहे. पाण्याची पातळी २४ टक्क्यांपर्यंत येऊन पोहचली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्याची तहान भागविणारा व गरज भासल्यास डाव्या-उजव्या कालव्यामार्फत अहमदनगर जिल्ह्याच्या रहाता, कोपरगाव आदी तालुक्यांपर्यंत पाणी पोहचविणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा अवघा एक हजार ३४१ दलघफू इतका शिल्लक राहिला आहे. धरणाचा एकूण क्षमता पाच हजार ६४० दलघफू इतक्या जलसाठ्याची आहे. धरणामधील पाण्याच्या पातळीत होणारी घट नाशिककरांची चिंता वाढविणारी असून, पावसाला समाधानकारक सुरुवात व्हावी, अशी आशा सर्वच बाळगून आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजाची शेतीची कामे खोळंबली असून, खरीप पिकांपूर्वीची मशागत रखडली आहे. विहिरीच्या पाण्यावर वाफे तयार करून तणनाशक फवारणीसाठी शेतवावर भिजविण्याची वेळ बळीराजावर आल्याचे चित्र शहराजवळील खेड्यांमध्ये पहावयास मिळत आहे.
नाशिककरांची चिंता वाढविणार
जुलै महिन्यापर्यंत नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असे सांगितले जात असले तरी गंगापूर धरणातील घटणार जलसाठा नाशिककरांची चिंता वाढविणारा आहे. कारण अद्याप पावसाला दमदार अशी सुरुवात झालेली नाही. धरणाचे पाणलोट क्षेत्र सुमारे तीनशे किलोमीटरपर्यंत असले तरी उत्तर महाराष्टÑावर वरुणराजाची कृपादृष्टी अद्याप होत नसल्याने चिंता वाढली आहे.
४ गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जूनमध्ये पर्जन्यमानाचे प्रमाण १०० मि.मी.पेक्षा अधिक घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अद्याप १७ जूनपर्यंत केवळ ४३ मि.मी. इतका पाऊस पडला आहे.

Web Title: 24 percent water storage in dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.