शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

भेंडी केंद्राला २४ तास वीजपुरवठा

By admin | Updated: January 30, 2016 23:21 IST

कळवण : पणन मंडळाचे व्यवस्थापक मिलिंद आकरे यांची माहिती

कळवण : भेंडी येथील कांदा, डाळींब व द्राक्ष निर्यात सुविधा केंद्राला सुविधांसह एक्स्प्रेस फीडरद्वारे वीजपुरवठा सुरळीत करून देण्याबाबत पणन मंडळाचे व्यवस्थापक मिलिंद आकरे यांनी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष व भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार यांना आश्वासन दिल्यामुळे एक्स्प्रेस फीडरद्वारे २४ तास वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात याबाबत निविदा निघणार असून, निधी मंजूर असल्याचे सहकार विभागाने सांगितले.शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष सुधाकर पगार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष सुधाकर पगार यांनी याबाबत बोलताना सांगितले की, शेतकरी सहकारी संघ व पणन मंडळाच्या सहकार्याने भेंडी येथे कांदा, डाळींब, द्राक्ष निर्यात सुविधा केंद्र बांधण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अपूर्ण सुविधा पूर्ण करून देण्याच्या अटीवर तीन लाख रुपये अनामत व २१ हजार रुपये भाडे प्रती महिना ११ महिने कराराने दि. १ मे २०१२ ते १ मे २०१४ या कालावधीसाठी दि. १८ मे २०१४ रोजी करारनामा करून चालविण्यास दिले होते. मात्र आजपावेतो अटींप्रमाणे विद्युतपुरवठा व प्रकल्पाच्या इतर अपूर्ण सुविधा पूर्तता न झाल्याने संस्थेने पणन कार्यालयाशी वारंवार लेखी पत्रव्यवहार व शिष्टमंडळाने समक्ष भेट घेऊनही काम पूर्ण होत नव्हते. भ्रमणध्वनीवरून आमदार राहुल अहेर यांच्याशी पणन मंडळाचे व्यवस्थापक मिलिंद आकरे यांनी संपर्क साधून सदर असुविधांबाबत चर्चा केली असता एक्स्प्रेस फीडरची निविदा काढण्यात आली असून, इतर सुविधा तत्काळ पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले असे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष सुधाकर पगार यांनी सांगितले. (वार्ताहर)