जिल्ह्यात दंगलखोरांविरुद्ध २३ गुन्हे
By Admin | Updated: October 14, 2016 01:00 IST2016-10-14T00:46:53+5:302016-10-14T01:00:46+5:30
सर्वत्र शांतता : समाजकंटकांची धरपकड सुरू

जिल्ह्यात दंगलखोरांविरुद्ध २३ गुन्हे
नाशिक : तळेगाव येथील बालिकेवर अत्याचार प्रकरणाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात उमटलेल्या पडसादातून समाजकंटकांनी ठिकठिकाणी दगडफेक, जाळपोळ व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी हजारो दंगलखोरांविरुद्ध २३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सध्या सर्वत्र शांतता असली तरी समाजकंटकांची धरपकड सुरू झाली आहे. शनिवार, दि. ८ रोजी सायंकाळी तळेगाव येथील बालिकेवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर रात्रीच संतप्त जमावाने नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील तळेगाव फाट्यावर जमून रास्ता रोको आंदोलन तसेच काही वाहनांना आग लावून पेटवून दिले होते. त्यानंतर रविवारी या घटनेचे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पडसाद उमटले. तळेगाव येथे घटनेच्या निषेधासाठी जमलेल्या जमावाने रास्ता रोको करून पोलीस वाहनांवर दगडफेक तसेच दोन वाहने रस्त्यावर पेटवून दिल्याची घटना घडली, त्यावर जमाव काबूत आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार व अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. हे वृत्त वाºयासारखे पसरताच ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने करून वाहनांवर दगडफेकीच्या तसेच एस.टी. बसेस पेटवून देण्याच्या घटना घडल्या. वाडीवºहे, विल्होळी, गोंदे, घोटी, शेवगेडांग आदि ठिकाणी परिस्थिती चिघळून दोन दिवस तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचे पुरेपूर प्रयत्न करीत राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करून समाजकंटकांची धरपकड सुरू केली, तर गोंदे, पाडळी येथे जमावाला पांगविण्यासाठी गोळीबाराच्या फैरी झाडाव्या लागल्या. शनिवार, दि. ८ ते बुधवार, दि. १२ या चार दिवसांच्या कालावधीत घडलेल्या गुन्ह्णांची पोलीस दप्तरात नोंद घेण्यात आली असून, २३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही गुन्ह्णांमध्ये आरोपींची ओळख पटलेली नाही तर काही गुन्ह्णांमध्ये आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.