निंबाळे शिवारात पिकअप पलटी २२ महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 05:52 PM2018-12-13T17:52:25+5:302018-12-13T17:52:39+5:30

चांदवड : तालुक्यातील निंबाळे गावाजवळ मनमाड - लासलगाव रोडवर मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पलटी झाल्याने त्यात २२ महिला जखमी झाल्या.

22 women injured in pick-up in Nimbale Shivar | निंबाळे शिवारात पिकअप पलटी २२ महिला जखमी

निंबाळे शिवारात पिकअप पलटी २२ महिला जखमी

Next

चांदवड : तालुक्यातील निंबाळे गावाजवळ मनमाड - लासलगाव रोडवर मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पलटी झाल्याने त्यात २२ महिला जखमी झाल्या. त्यापैकी चार महिलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मनमाड येथील शासकीय रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले. नांदगाव तालुक्यातील भालूर येथील दररोज ३० महिलांना घेऊन लासलगावजवळील करंजगाव येथे एका शेतात कांदा रोपे लावण्यासाठी पिकअप (क्र. एमएच ०६ एजी २५६९) ही जाते काल या पिकअपचालकाचे निंबाळे गावाजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तिने तीन पलटी घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात पलटी झाली. त्यात २२ महिला किरकोळ जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. जखमींना मनमाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यात तीन मुलींचा समावेश असून, जखमीमधील राणी सतीश अहेर (२७), भीमाबाई सुकदेव निकम (५०), लताबाई कांतिलाल मोरे (४०), इंदूबाई बाबूराव बागुल (६०) (सर्व रा. भालूर, ता. नांदगाव) यांना नाशिक येथे अधिक उपाचारासाठी हलविण्यात आले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.

Web Title: 22 women injured in pick-up in Nimbale Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात