शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

भोजापूर धरणात 22 टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 16:34 IST

नांदरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नद्या वाहत्या झाल्या आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थानाकडे तसेच भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. भोजापूर धरणात शनिवारी सकाळपर्यंत 80 दशलक्ष घनफूट म्हणजे बावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देपाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी: गतवर्षी आँगस्टच्या पहिल्या आठवड्यात भरले होते धरण

नांदरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नद्या वाहत्या झाल्या आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थानाकडे तसेच भोजापूरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. भोजापूर धरणात शनिवारी सकाळपर्यंत 80 दशलक्ष घनफूट म्हणजे बावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.तालुक्यासह परिसरातील गांवामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासूनच दमदार पाऊस पडल्याने बळीराजा समाधानी आहे. कमी अधिक प्रमाणात सर्वच भागात पाऊस पडत आहे. मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मागील आठवड्यात पावसाचा जोर ओसरला होता. परंतु पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेती शिवार हिरवेगार झाले आहे. तसेच शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असले तरीभोजापूर धरणाच्या पाणी साठ्यावरच लाभक्षेत्रातील शेतीचे गणित अवलंबूनअसते. परंतु. पाणलोट क्षेत्रात पाऊस नझाल्याने धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षी भोजापूर धरण दोन आँगस्टला पूर्ण भरले होते. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र धरणातील पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेतवाढला नाही. गतवर्षी भोजापूर धरणात 27 जुलै पासून पाण्याची आवक सुरु झाली होती. गेल्यावर्षी दोनच दिवसात धरणात 45 टक्के पाण्याची आवक झाली होती. तसेच दोन महिन्याच्या आसपास धरणातून पूरपाणी सुरु होते. भोजापूरच्या धरणाच्या पाण्यावर कणकोरी व मनेगाव नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. यावर्षी खरीप हंगामातच पावसाने जोरदार सलामी दिल्याने बळीराजा सुखावला आहे. 

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण