‘मेगा ड्राईव्ह’मध्ये २२ लाखांची दंडवसुली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:42 IST2017-09-13T00:42:01+5:302017-09-13T00:42:01+5:30
नाशिक : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवारी शहरात राबविण्यात आलेल्या हेल्मेट व सीटबेल्ट ड्राईव्हद्वारे मंगळवारी (दि़१२) ५ हजार ३६५ बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये केसेस करून २२ लाख ४६ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली आहे़

‘मेगा ड्राईव्ह’मध्ये २२ लाखांची दंडवसुली!
नाशिक : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवारी शहरात राबविण्यात आलेल्या हेल्मेट व सीटबेल्ट ड्राईव्हद्वारे मंगळवारी (दि़१२) ५ हजार ३६५ बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये केसेस करून २२ लाख ४६ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली आहे़
पोलीस आयुक्त सिंगल यांच्या आदेशान्वये मंगळवारी संपूर्ण शहरात एकाचवेळी ५२ ठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणी करण्यात आली़ वाहनचालकांवरील कारवाईप्रसंगी वादविवाद होऊ नये यासाठी व्हिडीओ कॅमेरे व बॉडी वॉर्न कॅमेरे लावण्यात आले होते़ पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकी चालविणाºया ३ हजार ९५१ वाहनचालकांवर कारवाई करून १९ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला़ तर सीटबेल्ट न वापरणे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १ हजार ४१४ वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करून २ लाख ७१ हजार रुपयांची दंड वसूल केला़
शहरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तसेच शहर वाहतूक विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते़वाहतूक नियम तसेच हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणाºया वाहनचालकांवर कारवाई सुरूच राहणार आहे़ या मोहिमेत बहुतांशी वाहनचालक हे हेल्मेटचा वापर न करता ते डिक्कीत अथवा वाहनाच्या आरशाला लावत असल्याचे आढळून आले असून, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे़ या मोहिमेत शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस, वकील अशा सर्वांवरच कारवाई करण्यात आली आहे़ दुचाकीस्वारांनी आपल्या स्वत:च्या व कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा़
- डॉ़ रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक