देवळा तालुक्यातील २१८ अंगणवाडीसेविकांना मोबाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:54 IST2019-04-12T00:53:02+5:302019-04-12T00:54:02+5:30

खर्डे : देवळा तालुक्यातील २१८ अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांना मोबाइल संच वितरीत करण्यात आले. यामुळे आता अंगणवाड्याही डिजिटल होत असून, पेपरलेस कारभाराकडे वाटचाल सुरू झाली आहे. येथील अंगणवाडी केंद्रात प्रशिक्षण कार्यक्र मात हे मोबाइल संच देण्यात आले.

218 Anganwadi Sevaks in Devla Taluka Mobile | देवळा तालुक्यातील २१८ अंगणवाडीसेविकांना मोबाइल

देवळा तालुक्यातील २१८ अंगणवाडीसेविकांना मोबाइल

ठळक मुद्देया मोबाइलमध्ये विशेष सॉप्टवेअर असून अंगणवाडी केंद्रातील माहिती सहज भरता येणार आहे.

खर्डे : देवळा तालुक्यातील २१८ अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांना मोबाइल संच वितरीत करण्यात आले. यामुळे आता अंगणवाड्याही डिजिटल होत असून, पेपरलेस कारभाराकडे वाटचाल सुरू झाली आहे. येथील अंगणवाडी केंद्रात प्रशिक्षण कार्यक्र मात हे मोबाइल संच देण्यात आले.
केंद्रीय महिला बालविकास मंत्रालयाच्या पोषण अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्याची निवड पायलट प्रोजेक्ट्साठी करण्यात आली आहे. त्यानुसार देवळा तालुक्यातील २१८ अंगणवाडीसेविकांना मोबाइल कार्यपद्धतीचे प्रशिक्षण सुरु आहे. यामुळे अंगणवाडीची कुपोषणमुक्ती, महिला आणि युवतींचे आरोग्य, मातांची माहिती, बालकांना पोषण आहार अशी सर्व माहिती आॅनलाईन देता येणे शक्य होणार आहे. या मोबाइलमध्ये विशेष सॉप्टवेअर असून अंगणवाडी केंद्रातील माहिती सहज भरता येणार आहे. यावेळी गटविकासअधिकारी महेश पाटील, मुख्य सेविका मीरा सहारे, एस.आर. पवार, टी. वाय. पवार, कल्याणी चव्हाण, एन.एम.थोरात आदी उपस्थित होते. तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्र म दोन टप्प्यात सुरु आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई ची नाशिक जिल्ह्याची समन्वयक संस्था संघर्ष समाज विकास मंडळ च्या वतीने या प्रशिक्षण कार्यक्र मात या संस्थेच्या वतीने राबवण्यात येत असलेले उपक्र मबाबत माहितीपत्रके वाटून माहिती देण्यात आली.

Web Title: 218 Anganwadi Sevaks in Devla Taluka Mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.