पहिल्याच दिवशी मंुबईला २१ सुवर्ण

By Admin | Updated: May 30, 2014 01:04 IST2014-05-30T00:12:09+5:302014-05-30T01:04:39+5:30

नाशिकच्या नचिकेतचा नवा विक्रम : राज्यस्तरीय ज्युनिअर जलतरण स्पर्धेला प्रारंभ

21 gold on the first day of the house | पहिल्याच दिवशी मंुबईला २१ सुवर्ण

पहिल्याच दिवशी मंुबईला २१ सुवर्ण

नाशिकच्या नचिकेतचा नवा विक्रम : राज्यस्तरीय ज्युनिअर जलतरण स्पर्धेला प्रारंभ
नाशिक : येथे आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर व सबज्युनिअर जलतरण स्पर्धेमध्ये नाशिकच्या नचिकेत बुझरूक याने ५० मीटर बटरफ्लायमध्ये ०.२७.८७ अशी राज्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट वेळ नोंदवित नवा विक्रम स्थापित केला; तर मंुबईच्या जलतरणपटूंनी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी वर्चस्व राखत विविध गटांतून २१ सुवर्णपदके पटकावत पदतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
नाशिकरोडच्या राष्ट्रमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना, नाशिक जिल्हा हौशी जलतरण संघटना व नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युनिअर व सबज्युनिअर जलतरण स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन महापौर ॲड. यतिन वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थायी समितीचे सभापती रमेश धोंडगे, नाशिकरोड प्रभाग सभापती कोमल मेहरोलिया, नगरसेवक संगीता गायकवाड, ललिता भालेराव, संगीता दलवाणी, संभाजी मोरुस्कर, कन्हय्या साळवे, योगिता अहेर, अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, देवंेद्र सिंग, राज्य संघटनेचे सचिव किशोर वैद्य आदिंची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक आबा देशमुख यांनी केले. अविनाश खैरनार यांनी आभार मानले.
उद्घाटन सत्रानंतर जलतरण स्पर्धेला प्रारंभ झाला. ज्युनिअर व सबज्युनिअर गटातील विविध स्पर्धांतून मंुबईच्या जलतरणपटूंनी पहिल्याच दिवशी पदतालिकेत आघाडी घेत वर्चस्व राखले. मंुबईने २१ सुवर्णपदकांसह ५० पदके पटकावली, तर दुसर्‍या स्थानी असलेल्या पुणेने सहा सुवर्णपदकांसह २१ पदके मिळविली. नाशिकच्या खात्यावर एका सुवर्णपदकासह पाच पदके असून, चौथे स्थान आहे. सहा पदकांसह ठाणे तिसर्‍या स्थानी आहे.

पदतालिका
जिल्हासुवर्णरौप्यकांस्यएकूण
मंुबई२११५१४५०
पुणे ६१०५२१
ठाणे २२२६
नाशिक११३५

वॉटरपोलोत नाशिकची विजयी सलामी
वॉटरपोलो प्रकारामध्ये नाशिकच्या संघाने विजयी सलामी दिली. नाशिकने जळगाव संघाला १६-० असे पराभूत केले. नाशिककडून अभिषेक कितुर (६), यश कांबळे (५), योगंेद्र देवरे (४) यांनी गोल केले.

नचिकेतचा विक्रम
नाशिकचा जलतरणपटू नचिकेत बुझरूक याने १४ वर्षांआतील मुलांच्या गटातील ५० मीटर बटरफ्लाय या क्रीडा प्रकारामध्ये ०.२७.८७ अशी सर्वोत्कृष्ट वेळ नोंदविली. आत्तापर्यंतच्या राज्य जलतरण स्पर्धेतील ही वेळ सर्वोत्कृष्ट ठरल्याने नचिकेतच्या नावे सदरचा विक्रम नोंदविला गेला.

स्पर्धेचा निकाल :
२०० मी. फ्री स्टाईल (मुले) : इशान जाफर (मंुबई-सुवर्ण), वेदांत राव (मुंबई-रौप्य), निमेश मुळे (वर्धा-कांस्य).
२०० मी. फ्री स्टाईल (मुली) : आयुषा बोरा (पुणे-सुवर्ण), माणिक चतुरमुथा (नाशिक-रौप्य), त्रिशा बीमाणी (मुंबई-कांस्य).
२०० मी. फ्री स्टाईल (मुले) : आर्यन मखिजा (मंुबई-सुवर्ण), सुकृत कापसे (मंुबई-रौप्य), अनिकेत चव्हाण (कोल्हापूर-कांस्य)
२०० मी. फ्री स्टाईल मुली : रयना सलदना (मंुबई-सुवर्ण), प्रोतिती सिन्हा (मंुबई-रौप्य), मल्लिका बैकेरीकर (मुंबई-कांस्य).
२०० मी. फ्री स्टाईल मुले : यश पत्की (मुंबई-सुवर्ण), अवधूत परुळेकर (कोल्हापूर-रौप्य), अमिर असरीवाला (मुंबई-कांस्य).
२०० मी. फ्री स्टाईल मुली : अनन्या मेहेरे (मुंबई-सुवर्ण), वेदिका मखिजा (मुंबई-रौप्य), अन्या त्यागी (ठाणे-कांस्य).
४०० मी. वैयक्तिक मिडले मुले : इशान जाफर (मंुबई-सुवर्ण), पार्थ राणे (पुणे-रौप्य), जोसन स्मिथ (मंुबई-कांस्य).
४०० मी. वैयक्तिक मिडले मुली : ज्योती पाटील (मुंबई-सुवर्ण), नूपुर कदम (ठाणे-रौप्य), सुब्या मुलानी (कोल्हापूर-कांस्य)
४०० मी. वैयक्तिक मिडले मुले : आर्यन मखिजा (मंुबई-सुवर्ण), वेदांत पारकर (मुंबई-रौप्य), अथर्व फडके (ठाणे-कांस्य).
४०० मी. वैयक्तिक मिडले मुली : प्रोतिती सिन्हा (मंुबई-सुवर्ण), मुस्कान तोलानी (मंुबई-रौप्य), रयना सालदना (मंुबई-कांस्य).
२०० मी. बॅकस्ट्रोक मुले : नील गंुडे (पुणे-सुवर्ण), हर्षल वाकनारिया (पुणे-रौप्य), ऋषिकेश जांभळे (कोल्हापूर-कांस्य).

Web Title: 21 gold on the first day of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.