पाच महिन्यांत पोस्ट बॅँकेतून २० कोटींचे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:25 AM2020-09-09T01:25:39+5:302020-09-09T01:26:21+5:30

भारतीय डाक विभाग फक्त पत्र पाठविण्यापुरता मर्यादित राहिला नसून, इंडिया पोस्ट पेमेंट बँकप्रणालीमार्फत गेल्या पाच महिन्यांत दीड लाख ग्राहकांनी २० कोटींचे व्यवहार केले आहेत. तसेच या काळात ३५ हजार नागरिकांनी नवीन खाते उघडले आहेत. पोस्ट बॅँकेचा सर्वाधिक लाभ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, रोजगार हमी योजनेच्या मजुरांना झाला आहे.

20 crore transactions from Post Bank in five months | पाच महिन्यांत पोस्ट बॅँकेतून २० कोटींचे व्यवहार

पाच महिन्यांत पोस्ट बॅँकेतून २० कोटींचे व्यवहार

Next
ठळक मुद्देशिष्यवृत्ती, रोहयो मजुरांना लाभ : पावणेदोन लाख खातेधारक; ३५ हजार नवीन खाती

नाशिक : भारतीय डाक विभाग फक्त पत्र पाठविण्यापुरता मर्यादित राहिला नसून, इंडिया पोस्ट पेमेंट बँकप्रणालीमार्फत गेल्या पाच महिन्यांत दीड लाख ग्राहकांनी २० कोटींचे व्यवहार केले आहेत. तसेच या काळात ३५ हजार नागरिकांनी नवीन खाते उघडले आहेत. पोस्ट बॅँकेचा सर्वाधिक लाभ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, रोजगार हमी योजनेच्या मजुरांना झाला आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू झाल्यापासून नाशिक जिल्ह्णात एकूण १ लाख ७० हजार ग्राहकांनी नोंदणी केली आहे. डाक सेवेचे नाशिक आणि मालेगाव अशा दोन विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून, नाशिक विभागात इगतपुरी, त्र्यंबक, पेठ, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी, सिन्नर आणि काहीअंशी निफाड तालुक्याचा समावेश होतो, तर उर्वरित तालुके हे मालेगाव विभागात येतात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील आधार संलग्न भुगतान सेवा (एईपीएस)मार्फत ग्राहकांना पोस्टमनद्वारे त्यांच्या घरी जाऊन पेमेंट देण्याची सेवा पोस्ट विभागामार्फत केली जात आहे. ग्रामीण भागातील खातेधारकांना बँकेतून पैसे काढावयाचे असल्यास तालुक्याच्या ठिकाणी पायपीट करावी लागत होती.

देशात लॉकडाऊनच्या काळात खातेधारकांना बँकेच्या या सेवेचा चांगला उपयोग झाला असून, पोस्टमन पैसे पोचविण्यासोबतच नागरिकांच्या फोनला रिचार्ज करून देणे, त्यांचे आॅनलाइन वीजबिल भरून देणे आदी महत्त्वाच्या कामांमध्येही मदत करत आहे.
डाक विभागातर्फे लवकरच इयत्ता दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी नवीन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्णातील ३७ हजार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी शासनस्तरावरून प्राप्त झाली असून, लवकरच जिल्ह्णातील सर्व महाविद्यालयांतील प्रचार्यांसोबत चर्चा करून ही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे मिळणार आहेत.
आदिवासी विकास विभागाकडून सुरू करण्यात येणाऱ्या खावटी योजनेसाठीदेखील या पर्यायाचा विचार सुरू झाला आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्णातील कातकरी आदिवासी समाजाच्या सर्वच नागरिकांचे खाते उघडण्यात आले असून, हा प्रयोग लवकरच राज्यभर अवलंबिला जाणार आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाºया मजुरांनादेखील या बँकेमध्ये लवकरच समाविष्ट करून त्यांनादेखील या सुलभ सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी सांगितले.

Web Title: 20 crore transactions from Post Bank in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.