नागरिकांत उदासिनता : मास्क न वापरणाऱ्या २ हजार ६२७ लोकांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 21:34 IST2020-06-09T21:34:08+5:302020-06-09T21:34:34+5:30
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हददीत लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी घराबाहेर पडु नये, तसेच अत्यावश्यक कामासाठी गरज भासल्यास बाहेर पडताना तोंडावर मास्क लावावा अस आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत;

नागरिकांत उदासिनता : मास्क न वापरणाऱ्या २ हजार ६२७ लोकांना दणका
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र तरीदेखील काही नागरिक अत्यंत निष्काळजीपणे मास्क न वापरता वावरत असल्याचे निदर्शनास येत असल्याने सर्वच पोलीस ठाण्यांकडून धडक कारवाई केली जात आहे. मास्कचा वापर केला नसल्याचे आढळून आलेल्या अद्याप २ हजार ६२७ लोकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हददीत लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी घराबाहेर पडु नये, तसेच अत्यावश्यक कामासाठी गरज भासल्यास बाहेर पडताना तोंडावर मास्क लावावा अस आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत; तरीदेखील मंगळवारी (दि.९) ४७ लोकांनी या आदेशाचा भंग केल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे संचारबंदी जमावबंदी आदेशाचे पालन न करणाºया ७४ लोकांवरही कारवाई करण्यात आली आहे. २२ मार्चपासून अद्यापपर्यंत भारतीय दंडविधान कलम १८८नुसार २ हजार ६२७ लोकांविरूध्द कारवाई केली गेली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती आयुक्तालयाच्या सुत्रांनी दिली आहे. नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या सर्व सुचनांचे पालन करत उपाययोजना करणे अनिवार्य असल्याचे नांगरे पाटील म्हणाले.