शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजासाठी २ हजार ५६९ जागा राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 01:16 IST

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मंजुरी दिल्यानंतर अकरावी प्रवेशप्रक्रियेतही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जागा निश्चित झाल्या असून, नाशिकमधील १६४ महाविद्यालांमध्ये सुमारे दोन हजार ५६९ जागा मराठा विद्यार्थ्यांसाठी राखीव असून,

नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मंजुरी दिल्यानंतर अकरावी प्रवेशप्रक्रियेतही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जागा निश्चित झाल्या असून, नाशिकमधील १६४ महाविद्यालांमध्ये सुमारे दोन हजार ५६९ जागा मराठा विद्यार्थ्यांसाठी राखीव असून, आर्थिक दुर्बल घटकांती विद्यार्थ्यांसाठी दोन हजार १५० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. या आरक्षणाचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी शिक्षण विभागाने अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्र ीयेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करून विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी ४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.नाशिक महापालिका क्षेत्रातील १४६ कनिष्ठ महाविद्यालयांमधील २३ हजार ८६० जागांसाठी आतापर्यंत २६ हजार ३६० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरला असून, २१ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी भाग दोन भरला आहे. यात मराठा आरक्षणाच्या (एसईबीसी) प्रवर्गातील केवळ १५३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाप्रमाणे अकरावीची प्रवेशप्रक्रिया वादात अडकण्याची भीती असल्याने त्यांनी याप्रवर्गातून अर्ज करणे टाळल्याची शक्यता लक्षात घेऊन आॅनलाइन अर्जांसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत कला शाखेसाठी तीन हजार ११९ वाणिज्यसाठी आठ हजार ८६०, तर विज्ञानसाठी नऊ हजार ४१९ अर्ज प्राप्त झाले असून, एमसीव्हीसीसाठी केवळ ३१ अर्ज प्राप्त झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये आयसीएसई बोर्डातून उत्तीर्ण झालेल्या ५६३, तर सीबीएसई बोर्डाच्या ६३२ विद्यार्थ्यांनी अर्ज आले आहे. प्रवेशप्रक्रियेत या विद्यार्थ्यांचे अनुक्रमे पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जाणार आहे, तर एसएसी बोर्डाच्या २४ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी भाग एक व २० हजार ३५१ विद्यार्थ्यांनी भाग दोन भरला आहे.सुधारित वेळापत्रक असेच्प्रथम फेरी४ जुलैपर्यंत आॅनलाइन अर्ज करणे.५ जुलैला सर्वसाधारण गुणवत्ता यादी.६ व ८ जुलैपर्यंत हरकती नोंदविणे.१२ जुलैला पहिली गुणवत्ता यादी.१३ ते १६ जुलैला प्रवेश निश्चित करणे.च्दुसरी फेरी१६ जुलैला दुसऱ्या यादीसाठी उपलब्ध जागांची माहिती.१७ व १८ जुलैला अर्जाच्या भाग १, २ मध्ये बदल करणे.२२ जुलैला दुसरी गुणवत्ता यादी.२३ ते २५ जुलैला प्रवेश निश्चित करणे.च्तिसरी फेरी२५ जुलैला तिसºया यादीसाठीच्या जागांची माहिती.२७ ते २९ जुलैला अर्जाच्या भाग १, २ मध्ये बदल करणे.१ आॅगस्टला तिसरी गुणवत्ता यादी.२ ते ५ आॅगस्टला प्रवेश निश्चित करणे.च्विशेष फेरी५ आॅगस्टला विशेष गुणवत्ता यादीसाठीच्या जागा समजणार६ व ७ आॅगस्टला अर्जात बदल करणे.९ आॅगस्टला विशेष गुणवत्ता यादी.१० ते १३ आॅगस्ट प्रवेश निश्चित करणे.

टॅग्स :marathaमराठाEducationशिक्षण