शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२७ लाखांचा मद्यसाठा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:57 IST

पंजाब राज्यात निर्मित केलेला व केवळ अरुणाचल प्रदेश व चंदीगढ केंद्रशासित प्रदेशात विक्रीस परवानगी असलेल्या मद्याची महाराष्टÑातील विविध जिल्ह्यांत निवडणूक कालावधीत विक्री करण्याच्या उद्देशाने हतगड शिवार येथील सावमाळ गावातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात दडवून ठेवलेला २७ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा विभागीय भरारी पथकाने छापा मारून हस्तगत केला.

ठळक मुद्दे५७३ खोके जप्त : विभागीय भरारी पथकाचा छापा

नाशिक : पंजाब राज्यात निर्मित केलेला व केवळ अरुणाचल प्रदेश व चंदीगढ केंद्रशासित प्रदेशात विक्रीस परवानगी असलेल्या मद्याची महाराष्टÑातील विविध जिल्ह्यांत निवडणूक कालावधीत विक्री करण्याच्या उद्देशाने हतगड शिवार येथील सावमाळ गावातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात दडवून ठेवलेला २७ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा विभागीय भरारी पथकाने छापा मारून हस्तगत केला.विधानसभा निवडणूक प्रचाराचा ज्वर जिल्ह्यात वाढला असून, शहर व ग्रामीण भागात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांकडून प्रचारावर भर दिला जात आहे. दरम्यान, ओल्या पार्ट्या रंगण्याची शक्यता लक्षात घेत राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला आहे. विभागीय भरारी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.१३) सुरगाणा तालुक्यातील हतगड शिवार येथील सावळमाळ गावातील बांधकामस्थितीत असलेल्या इमारतीत छापा मारला. यावेळी पथकाच्या हाती मद्यसाठ्याचे मोठे घबाड लागले. यामध्ये चक्क पंजाब राज्यात निर्मित करण्यात आलेल्या व अरुणाचल प्रदेश या एकमेव राज्यात विक्रीस परवानगी असलेले मद्य आढळून आले. यावेळी निरीक्षक आर. एम. फुलझळके, देवदत्त पोटे, रावते, दीपक आव्हाड, झनकर, लोकेश गायकवाड आदींनी झडतीसत्र राबविले.असा आहे मद्यसाठा१८० मिलिच्या ब्ल्यू व्हिस्कीच्या १४ हजार ११२ सीलबंद बाटल्यांचे २९४ खोके जप्त केले आहेत. हे मद्य केवळ अरुणाचल प्रदेशमध्ये विक्रीस परवानगी आहे. त्याची किंमत अंदाजे १८ लाख ३४ हजार ५६० रुपये इतकी असल्याचे पथकाने सांगितले. चंदीगढ राज्यात विक्रीसाठी असलेला जिन्सबर्ग प्रीमियम स्ट्रॉँग बियरच्या ५०० मिलिचे ६ हजार ६९६ सीलबंद टीनचे सुमारे २७९ खोके पथकाने हस्तगत केले आहेत. त्याची किंमत सुमारे ८ लाख ३७ हजार रुपये इतकी आहे.या कारवाईत एकूण २६ लाख ७१ हजार ५६० रुपये किमतीचे मद्याचे अवैधरीत्या साठा करून ठेवलेले सुमारे ५७३ खोके उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहेत. या प्रकरणी सुनील लक्ष्मण खंबायत (२१, रा. हतगड) यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच मद्यसाठा पुरवठादार व विकत घेणाऱ्या मूळ विक्रेत्याचा पथकाद्वारे शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019liquor banदारूबंदी