शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

आॅनलाइन फसवणुकीतील १५ लाख केले वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 11:48 PM

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या उपस्थितीत नुकतीच पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील सर्व परिक्षेत्रांचे प्रमुख पोलीस आयुक्त, अधीक्षक यांची बैठक पार पडली.

ठळक मुद्दे राज्यात प्रथम : उद्धव ठाकरे यांनी घेतली सहामाही गुन्हे आढावा बैठक; ग्रामीण पोलिसांची कामगिरी

नाशिक : पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या उपस्थितीत नुकतीच पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील सर्व परिक्षेत्रांचे प्रमुख पोलीस आयुक्त, अधीक्षक यांची बैठक पार पडली.या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. इमारतीत सायबर पोलीस ठाणे कार्यरत आहे. या पोलीस ठाण्याचे प्रमुख निरीक्षक सुभाष अनमुलवार, उपनिरीक्षक कल्पेश दाभाडे यांच्यासह नाईक सोनाली पाटील, आरती पारधी, प्रमोद जाधव, परिक्षीत निकम, प्रकाश मोरे, सुनील धोक्रट, विकास टेकुळे, सरिता अक्कर, प्राजक्ता सोनवणे यांचा चमू कार्यरत आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आॅनलाइन फसवणुकीचा छडा लावत या पथकाकडून २०१९ साली दाखल २५ गुन्ह्यांमधील १६ लाख ५० हजारांच्या रकमेपैकी एकूण १५ लाख १६ हजाराची रक्कम पुन्हा मिळविली गेली. ज्या फिर्यादींची फसवणूक झाली होती, त्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. आॅनलाइन फसवणुकीचा प्रकार लक्षात घेत त्यानुसार कायद्याचे निरीक्षण नोंदवित काही गुन्ह्यांत संबंधित बॅँकांना जबाबदार धरत त्यांच्या ग्राहकांची फसवणुकीत गेलेली रक्कम पोलिसांनी मिळवून दिली आहे, असे अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. सायबर पोलिसांच्या कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. कारण आॅनलाइन पेमेंट अ‍ॅप्लिकेशनचा वाढता वापर अणि आॅनलाइन फसवणुकीचे वाढते प्रमाण यामुळे २०१९ साली२५ गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झाले.प्रथम क्रमांकग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या सायबर पोलीस ठाण्याने सायबर गुन्ह्यांमधील रोख रक्कम पुन्हा मिळविण्यामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सायबर पोलिसांनी २०१९ साली आॅनलाइन सायबर गुन्ह्यांमधील तब्बल १५ लाख १६ हजारांची रक्कम वसूल केली आहे. तसेच सायबर गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये हे पोलीस ठाणे राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.३३ गुन्हे उघडकीस आणण्यात यशग्रामीण सायबर पोलिसांना मागील तीन वर्षांमध्ये दाखल १०९ गुन्ह्यांपैकी तब्बल३३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. त्यामुळे हे पोलीस ठाणे राज्यात गुन्हे उघडकीस आणण्याबाबत चौथ्या क्रमांकावर राहिले. २०१९ साली २५ पैकी१० तर २०१८ मध्ये ३६ पैकी १० आणि २०१७ साली ४८ पैकी केवळ १३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस यशस्वी झाले होते. मागील वर्षभरापासून सायबर पोलिसांच्या कामगिरीचा आलेख अधीक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उंचावलेल्या आकडेवाडीवरून दिसून येतो.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम