अल्पवयीन संशयिताकडून २ लाख ३० हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:17 IST2018-04-19T00:17:38+5:302018-04-19T00:17:38+5:30

वणी : घराच्या भिंतीलगत असलेल्या घराच्या छतावरील कौले काढून कपाटामधून पैसे चोरणाऱ्या अल्पवयीन संशयितास सीसीटीव्हीच्या साह्याने पकडून २ लाख ३० हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

2 lakh 30 thousand stolen from a minor suspect | अल्पवयीन संशयिताकडून २ लाख ३० हजारांची चोरी

अल्पवयीन संशयिताकडून २ लाख ३० हजारांची चोरी

ठळक मुद्देसंशयितास सीसीटीव्हीच्या साह्याने पकडून २ लाख ३० हजारांची रोख रक्कम जप्तपोलिसी खाक्यापुढे पोपटाप्रमाणे त्याने माहिती देत चोरीची कबुली दिली.


वणी : घराच्या भिंतीलगत असलेल्या घराच्या छतावरील कौले काढून कपाटामधून पैसे चोरणाऱ्या अल्पवयीन संशयितास सीसीटीव्हीच्या साह्याने पकडून २ लाख ३० हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
आचार्य हॉस्पिटलमागे हर्षद समदडिया हे धान्य व्यापारी वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून समदडिया यांच्या घरातील कपाटातून ठरावीक कालावधीनंतर रोख रकमांची चोरी होत होती. पहिल्या वेळेस १ लाख ५० हजार, दुसºयांदा ५० हजार तर तिसºया वेळी ३० हजार अशी एकूण २ लाख ३० हजारांची रक्कम चोरीस गेली. चोरीच्या प्रकाराने समदडिया कुटुंबीय चक्रावून गेले. घरात याबाबत विचारणा केली तेव्हा या प्रकाराबाबात कोणालाच काही माहिती नव्हती. तद्नंतर समदडिया यांनी घरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली व पाळत ठेवली. दरम्यान, समदडिया यांची पत्नी मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेल्या तेव्हा एक अल्पवयीन घराच्या छतावर चढ़ून कौले काढून आत प्रवेश करून कपाटातील पैसे काढताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आला. समदडिया यांनी पोलिसांना सदर माहिती दिली. पोलिसांनी चौकशी कामी संबंधिताला बोलावले. प्रारंभी त्याने दिशाभूल केली, मात्र पोलिसी खाक्यापुढे पोपटाप्रमाणे त्याने माहिती देत चोरीची कबुली दिली. पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रंगनाथ सानप, नितीन पाटील करीत आहेत.

Web Title: 2 lakh 30 thousand stolen from a minor suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :crimeगुन्हे