शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’अंतर्गत १९८६ प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:21 IST

नाशिक : कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरपर्यंत प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात झालेल्या लॉटरीतील विद्यार्थ्यांचेच अद्याप १०० टक्के प्रवेश होऊ शकलेले नाही. आरटीईअंतर्गत आतापर्यंत केवळ एक हजार ९८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, दोन हजार ४६० विद्यार्थ्यांचे प्राथमिक प्रवेश झाले असून, लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ८८१ विद्यार्थी अजूनही प्राथमिक टप्प्यातील प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्दे८८१ विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत : २ हजार ४६० विद्यार्थ्यांचे प्राथमिक प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरपर्यंत प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात झालेल्या लॉटरीतील विद्यार्थ्यांचेच अद्याप १०० टक्के प्रवेश होऊ शकलेले नाही. आरटीईअंतर्गत आतापर्यंत केवळ एक हजार ९८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, दोन हजार ४६० विद्यार्थ्यांचे प्राथमिक प्रवेश झाले असून, लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ८८१ विद्यार्थी अजूनही प्राथमिक टप्प्यातील प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.आरटीईअंतर्गत जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपर्यंत सुमारे १९८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, वेगवेगळ्या शाळांमध्ये २ हजार ४६० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला आहे. राज्यभरात आतापर्यंत सुमारे १५ हजार ७५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर ४० हजार ११५ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला आहे. प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अंतिम प्रवेश निश्चित केले जात असल्याने यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेत एकच लॉटरी झालेली असतानाही प्रवेशप्रक्रिया लांबली आहे. दरम्यान, आरटीई प्रवेशप्रक्रियेत एकाच सोडतीद्वारे प्रवेशाची संधी मिळणार असून, उर्वरित जागांसाठी प्रतीक्षा यादीही सोडतीच्याच वेळी जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीत निवड झालेल्या मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना आवश्यक कागदपत्र पडताळणी समितीसमोर सादर करून प्रवेश निश्चित करावी लागणार आहे. त्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. परंतु अद्याप लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचीच प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी काहीकाळ वाट पाहावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. निवडीसंदर्भात संकेतस्थळावर पडताळणी आवश्यकआरटीई प्रवेशप्रक्रियेत यावर्षी आॅनलाइनपद्धतीने राज्यस्तरावरून एकच सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीद्वारे प्रवेशाची संधी मिळालेल्या व प्रतीक्षायादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे. परंतु, लॉटरीनंतर ज्या पालकांना अद्याप एसएमएस प्राप्त झालेला नाही, त्यांनी संकेतस्थळावरून पडताळणी करावी. जिल्ह्यातील स्थिती शाळा ४४७राखीव जागा ५,५५७आॅनलाइन अर्ज १७,६३०लॉटरीत निवड ५,३०७प्राथमिक प्रवेश २,४६०प्रवेश निश्चित १,९८६

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी