जिल्ह्यात १९० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 01:45 IST2021-01-18T01:44:19+5:302021-01-18T01:45:04+5:30
जिल्ह्यात रविवारी (दि. १७) १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १२८ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान मालेगाव मनपा क्षेत्रात एक मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील बळींची संख्या २०२९ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात १९० कोरोनामुक्त
नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. १७) १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १२८ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान मालेगाव मनपा क्षेत्रात एक मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील बळींची संख्या २०२९ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १३ हजार ६८६ वर पोहोचली असून त्यातील १ लाख १० हजार ३४२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १३१५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.०६ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.५७, नाशिक ग्रामीण ९६.५१, मालेगाव शहरात ९३.२४, तर जिल्हाबाह्य ९५.१६ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे.