19 आमदार निलंबित, राष्ट्रवादीचे सरकारविरोधात निषेध आंदोलन
By Admin | Updated: March 23, 2017 13:54 IST2017-03-23T13:54:28+5:302017-03-23T13:54:28+5:30
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 आमदारांचं निलंबन करण्यात आल्याविरोधात राष्ट्रवादीने दिंडोरी येथे निषेध आंदोलन केलं.

19 आमदार निलंबित, राष्ट्रवादीचे सरकारविरोधात निषेध आंदोलन
ऑनलाइन लोकमत
दिंडोरी (नाशिक), दि. 23 - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना प्रचंड गोंधळ घालून अडथळा निर्माण करणे, टाळ वाजविणे, भजन म्हणणे, बॅनर फडकविणे आणि घोषणाबाजी केल्याबद्दल तसेच नंतर अर्थसंकल्पाच्या प्रती विधान भवन परिसरात जाळल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या १९ आमदारांना ३१ डिसेंबर २०१७पर्यंत निलंबित करण्यात आले. यात आमदार नरहरी झिरवाळ यांचाही समावेश आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांच्या निलंबन कारवाईचे पडसाद दिंडोरीत उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरुद्ध थाळीनाद आंदोलन करत सरकारचा निषेध केला आहे. कृऊबा सभापती दत्तात्रय पाटील, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे आदींच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी थाळीनाद करत सरकार विरोधी घोषणा देण्यात येऊन कर्जमाफी करण्याबरोबर आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.