शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
3
अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
4
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
5
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
6
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
7
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
8
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
9
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
10
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
11
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
12
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
13
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
14
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
15
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
16
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
17
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
18
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
19
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
20
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभागातील बारावी परीक्षेत पहिल्याच दिवशी १९ गैरप्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 22:46 IST

बारावीच्या परीक्षेत गेल्यावर्षी सर्वांत कमी गैरप्रकार घडलेल्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी पहिल्याच दिवशी सर्वाधिक दहा कॉपीची प्रकरणे समोर आली आहे, तर जळगावमध्ये सात व नंदूरबारमध्ये दोन असे नाशिक विभागात एकूण १९ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत.

ठळक मुद्दे बारावी परीक्षेत नाशिक जिल्ह्यात दहा कॉपीबहाद्दरधुळे जिल्ह्याची पहिल्या दिवसापासून कॉपीमुक्तीकडे वाटचाल

नाशिक :  विभागात २३४ परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षेला सुरुवात झाली असून, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी भाषेच्या पेपरला विभागात १९ गैरप्रकारांची (कॉपी) प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे विभागातील धुळे जिल्ह्यात एकही गैरप्रकार घडला नसून धुळे जिल्ह्याने पहिल्या दिवसापासूनच कॉपीमुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. बारावीच्या परीक्षेत गेल्यावर्षी सर्वांत कमी गैरप्रकार घडलेल्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी पहिल्याच दिवशी सर्वाधिक दहा कॉपीची प्रकरणे समोर आली आहे, तर जळगावमध्ये सात व नंदूरबारमध्ये दोन असे नाशिक विभागात एकूण १९ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. विभागातून १ लाख ६६ हजार ७१८ विद्यार्थी इंग्रजीच्या पेपरला प्रविष्ट झाले होते. यात नाशिकच्या ७५ हजार ३४३, धुळे २५ हजार २६४ , जळगावमधून ४९ हजार ४०३ व नंदुरबारमधील १६ हजार ४६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी विभागातील १ लाख ६५ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी पेपर दिला, तर १ हजार १७३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.नाशिक जिल्ह्यातील ४३१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील नाशिकच्या ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांनी ९५ परीक्षा कें द्रावर पहिल्या दिवशी इंग्रजी भाषेचा पेपर दिला. त्यासाठी ९५ केंद्र संचालक व ६५ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. पालकांच्या शुभेच्छा विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देणाºया बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी अनेक पालक पहिल्या दिवशी परीक्षा केंद्रांपर्यंत आले होते. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन भविष्यात आपला पाल्य उज्ज्वल भविष्य घडवेल अशा आत्मविश्वाने या पालकांनी त्यांच्या पाल्यांना भावुक होऊन शुभेच्छा दिल्या.

गुरुवारी दुसरा पेपरइंग्रजीच्या पहिल्या पेपरनंतर बुधवारी (दि. १९) शिवजयंतीची सुटी आहे, तर गुरुवारी सकाळच्या सत्रात  ११ ते २ या सकाळ सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, तमिळ, तेलगू, पंजाबी, बंगाली  भाषांचा तर दुपारच्या सत्राता ३ ते ६ या सत्रात उर्दू,  फ्रेंच, पाली भाषेचा पेपर होणार आहे. बुधवारच्या सुटीमुळे विद्यार्थ्यांना या पेपरचा अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थी