नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय परिसरातील तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी (दि.१८) मध्यरात्री ‘आॅल आउट आॅपरेशन’ राबविण्यात आले. यावेळी पोलिसांच्या यादीवरील १२९ सराईत गुन्हेगारांपैकी ८९ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. तसेच ६२ तडीपार गुंडांचे ठावठिकाणे तपासले असता ते हद्दीत आढळून आले नाही.शहरात कुठल्याही प्रकारे सार्वजनिक सण-उत्सवांना गालबोट लागू नये, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी परिमंडळ-१ व २मध्ये ‘मिशन आॅल आउट’ मोहीम राबविण्याचे आदेश दिले. यावेळी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांची तपासणी तसेच हॉटेल, लॉज, ढाबे, धर्मशाळा, गुन्हेगारांचे अड्डे, टवाळखोर, ट्रीपलसीट रायडर्स, कागदपत्रे जवळ न बाळगता वाहने चालविणारे, मद्यपी वाहनचालक अशा सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यावेळी आयुक्तालयाच्या हद्दीवर नांदूर नाका, सिन्नरफाटा, म्हसरूळ, गरवारे पॉइंट, एक्स-लो पॉइंट, बडदेनगर, संसरी नाका, शालिमार आदी ठिकाणी चोख नाकाबंदी करण्यात आली. यावेळी नाकाबंदीदरम्यान ३३६ संशयास्पद वाहने तपासण्यात आली. यापैकी २६ वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येऊन ५ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली.या मोहिमेदरम्यान मध्यरात्रीपर्यंत रस्त्यांवर तसेच परिसरात टवाळ्या करणाºया ८४ टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली. २६ झोपडपट्ट्यांची तपासणी करण्यात आली. ८४ हॉटेल्स, लॉज तपासण्यात येऊन मुंबई पोलीस कायद्यानुसार २३ कारवाया यावेळी करण्यात आल्या. पोलिसांना विविध गुन्ह्यांत फरार असलेले ११ संशयित हवे असून, त्यापैकी एकही संशयित हाती लागला नाही. या मोहिमेत ४ उपायुक्तांसह ७ सहायक आयुक्त, १७ निरीक्षक, ३१ सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक, ११७ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
८९ सराईत गुन्हेगारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:09 IST
शहर पोलीस आयुक्तालय परिसरातील तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी (दि.१८) मध्यरात्री ‘आॅल आउट आॅपरेशन’ राबविण्यात आले. यावेळी पोलिसांच्या यादीवरील १२९ सराईत गुन्हेगारांपैकी ८९ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. तसेच ६२ तडीपार गुंडांचे ठावठिकाणे तपासले असता ते हद्दीत आढळून आले नाही.
८९ सराईत गुन्हेगारांवर कारवाई
ठळक मुद्देनाकाबंदी : २६ वाहनचालकांकडून ५ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल