आदिवासी विकासमंत्र्यांसमवेत १८ला बैठक

By Admin | Updated: June 14, 2014 01:54 IST2014-06-14T01:18:30+5:302014-06-14T01:54:22+5:30

नाशिक : दोेन दिवसांपासून आदिवासी विकास आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या लोकसंघर्ष समितीने गुरुवारी रात्री उशिरा लेखी आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

18th meeting with tribal developmentists | आदिवासी विकासमंत्र्यांसमवेत १८ला बैठक

आदिवासी विकासमंत्र्यांसमवेत १८ला बैठक

नाशिक : दोेन दिवसांपासून आदिवासी विकास आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या लोकसंघर्ष समितीने गुरुवारी रात्री उशिरा लेखी आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला. येत्या १८ जूनला आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या समवेत लोकसंघर्ष समितीची बैठक मुंबईत होणार असून, त्यात वनहक्क दावे व आश्रमशाळांतील भोजन या महत्त्वाच्या प्रश्नांवर धोरण ठरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बुधवारी (दि. ११) आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष समितीच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर हा मोर्चा आदिवासी विकास आयुक्तालयाच्या कार्यालयावर येऊन धडकला. सुरुवातीला आदिवासी आयुक्त व मोर्चेकरी यांच्यात समन्वय न झाल्याने मोर्चेकऱ्यांनी आदिवासी विकास आयुक्तालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांचा मोर्चा सुरूच होता. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान आदिवासी विकास आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी लोकसंघर्षच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्यासह श्याम पाटील, आनंद भालेराव, राजपालसिंह राणा, काथाभाऊ वसावे, रामदास वळवी, राजू देसले, धरमसिंग वाघेला, प्रदीप पावरा, बुधा दादा, नंदू वाघ आदिंच्या शिष्टमंडळाशी सायंकाळी उशिरापर्यंत चर्चा करून काही मागण्या मान्य केल्या; मात्र मोर्चेकऱ्यांनी आदिवासी विकासमंत्र्यांच्या लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन स्थगित करण्यास नकार दिला. त्यामुळे रात्री नऊच्या सुमारास आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी लेखी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. पिचड यांनी मोर्चेकऱ्यांना १८ जून रोजी मुंबईत बैठकीसाठी बोलावले आहे. तत्पूर्वी १७ जूनला नंदुरबार येथे विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री आंदोलन स्थगित केल्यानंतर शुक्रवारी (दि. १३) बंद करण्यात आलेला गडकरी चौक ते त्र्यंबक नाकादरम्यानचा दुहेरी रस्ता पूर्ववत सुरू करण्यात आला.

Web Title: 18th meeting with tribal developmentists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.