उमराणे बाजार समितीत नवीन मक्याला १८७१ रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 00:42 IST2021-09-22T00:40:41+5:302021-09-22T00:42:32+5:30
उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल पावसाळी कांद्यांसह चालू हंगामातील नवीन मका विक्रीस आला असून, कांद्यास सर्वोच्च २१२१ रुपये, तर मक्यास १८७१ प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला आहे.

उमराणे बाजार समितीत नवीन मक्याला १८७१ रुपये दर
उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल पावसाळी कांद्यांसह चालू हंगामातील नवीन मका विक्रीस आला असून, कांद्यास सर्वोच्च २१२१ रुपये, तर मक्यास १८७१ प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला आहे. सोमवारी (दि. २०) खारीपाडा येथील मार्केटमध्ये लाल पावसाळी कांदा विक्रीस आला असतानाच मंगळवारी (दि. २१) उमराणे येथील बाजार समितीतही तामसवाडी येथील शेतकरी रामनाथ पंढरीनाथ कांदे यांनी पिकअप वाहनांमधून लाल पावसाळी कांदा विक्रीस आणला होता. त्यास आयूष आडतचे संचालक सतीश देवरे यांनी २१२१ रुपये दराने सर्वोच्च बोली लावत खरेदी केला. यावेळी बाजार समितीच्या वतीने समितीचे कर्मचारी राहुल देवरे व सागर अहिरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफणा, शैलेश देवरे, मुन्ना अहेर, रामराव देवरे, रामदास गायकवाड, संतोष देवरे, सतीष देवरे, बाजार समितीचे सचिव नितीन जाधव, सह. सचिव तुषार गायकवाड आदींसह बहुतांशी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.