अठरा लाखांची फसवणूक; संशयितास कोठडी

By Admin | Updated: July 19, 2014 01:09 IST2014-07-18T23:29:28+5:302014-07-19T01:09:10+5:30

अठरा लाखांची फसवणूक; संशयितास कोठडी

18,000 cheating; Suspect's closet | अठरा लाखांची फसवणूक; संशयितास कोठडी

अठरा लाखांची फसवणूक; संशयितास कोठडी

वणी : छत्तीस गुंतवणूकदारांच्या अठरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या गुजरातच्या संशयिताला २१ जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील छत्तीस गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या रकमेवर आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार वणी पोलिसांत दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दिनेशभाई खजीभाई पटेल (गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. न्यायालयाने आज त्याला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. लखमापूर येथील संतोष सूर्यवंशी या एजंटाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचे अठरा लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप पटेल यांच्यावर आहे.
आस्था इंटरनॅशनल सुरत या कंपनीचा एजंट म्हणून काम करणाऱ्या दिनेश पटेल व संतोष सूर्यवंशी यांनी गुंतवणूकदारांना पैसे काढण्यासाठी सुरत येथील अ‍ॅक्सिस बॅँकेचे एटीएम कार्ड दिले होते. मात्र, पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड चालले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार कारभारी जयराम भोर यांनी दिल्यानंतर एटीएम कार्डचे उगमस्थान शोधण्यासाठी वणी पोलिसांचे पथक सुरत येथे गेले असता अ‍ॅक्सिस बॅँकेचे ते असल्याची माहिती मिळाली.
मात्र, अधिकृत कागदपत्रांशिवाय ते कार्यान्वित होत नसल्याची माहिती मिळाली. दरम्यान, सुरत पोलिसांमध्ये आस्था कंपनी विरोधात ३ फेब्रुवारी २०१३ रोजी १६ गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुरत पोलिसांनी दिली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून महत्त्वाची माहिती प्राप्त करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू असले तरी संतोष सूर्यवंशी या पटेल याच्या सहकाऱ्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. (वार्ताहर)

Web Title: 18,000 cheating; Suspect's closet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.