वृद्धाचे अपहरण करून १८ लाखांना गंडविले
By Admin | Updated: May 10, 2017 18:54 IST2017-05-10T18:54:14+5:302017-05-10T18:54:14+5:30
एकाकीपणाचा फायदा : चार महिने डांबून ठेवत सातत्याने मारहाण

वृद्धाचे अपहरण करून १८ लाखांना गंडविले
नाशिक : गंगापूररोड या उच्चभ्रू परिसरातील नरसिंहनगरमध्ये राहणाऱ्या एका ऐंशी वर्षीय वृद्ध इसमाच्या एकटेपणाचा फायदा घेत पाच भामट्यांनी षडयंत्र रचून त्यांचे दोन वर्षांपूर्वी अपहरण केले. संशयिताने अशोकामार्ग परिसरातील स्वत:च्या राहत्या घरात वृद्ध इसमास डांबून ठेवत मारहाण केली आणि धमकावून सुमारे १८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.