आठ महिन्यांत १७ खून; ५६ बलात्कार, ५२ चेन स्नॅचिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:15 IST2021-09-19T04:15:24+5:302021-09-19T04:15:24+5:30
--- आकडेवारी सांगतेय.... वर्ष- खून-- बलात्कार--- चेन स्नॅचिंग--- २०२०- ...

आठ महिन्यांत १७ खून; ५६ बलात्कार, ५२ चेन स्नॅचिंग!
---
आकडेवारी सांगतेय....
वर्ष- खून-- बलात्कार--- चेन स्नॅचिंग---
२०२०- २३--- ५६--- -- ९४
--
२०२१-- १७--- ५६--- --- ५२
----
तीन घटनांनी हादरले होते शहर
घटना क्र.१
भूमाफियांच्या टोळीने अत्यंत नियोजनबद्ध कट रचून आनंदवली भागात एक वृद्ध भूधारकाच्या खुनाची सुपारी होमगार्डला दिली होती. १७ फेब्रुवारी रोजी या टोळीने रमेश बाळू मंडलिक (७०) यांचा निर्घृणपणे खून केला होता. या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्याचा तपासात दस्तुरखुद्द पोलीस आयुक्तांनी लक्ष घातले आणि हा केवळ एका वृद्धाचा खून आहे, असे नाही तर यामागे भूमाफियांची टोळी सक्रिय असल्याचे शोधून काढले. या गुन्ह्यात १९ संशयितांच्या टोळीवर पोलीस आयुक्तांनी मोक्काची कारवाई केली.
--
घटना क्र.२
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पाथर्डी फाटा भागात मागील महिन्यात मातृत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली होती. आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचे आईने उशीने तोंड दाबून ठार मारले आणि नंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेने अवघे शहर सुन्न झाले होते, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या खुनाच्या घटनेमुळे मातृत्वाच्या नात्यालाही काळीमा फासली गेली होती.
--
घटना क्र.३
जुने नाशिक परिसरात द्वारकेजवळ ८ फेब्रुवारी रोजी आकाश रंजवे या तरुणाचा आपआपसांतील गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वर्चस्वावरुन निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेनंतर द्वारका, महालक्ष्मी चाळ, वडाळानाका परिसरात दंगल उसळली होती. दोन टोळ्या समोरासमोर भिडल्या होत्या. यानंतर पोलिसांनी २१ संशयितांविरुद्ध खून, दंगलीचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलीस आयुक्तांनी या गुन्ह्यातील टोळीविरुद्ध मोक्काचा फास आवळला होता.
180921\18nsk_8_18092021_13.jpg
आठ महिन्यांत १७खून