मालेगावी तिघा चोरट्यांकडून १७ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 16:16 IST2018-12-03T16:15:23+5:302018-12-03T16:16:09+5:30

मालेगाव : धुळे, मालेगाव, वडाळीभोई, चांदवड, चाळीसगाव, बेलदारवाडी, पिलखोड अशा विविध ठिकाणांहून गेल्या तीन-चार महिन्यांपासून दुचाकी चोरणाऱ्या तिघा जणांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे.

17 bikes were seized from three thieves in Malegaon | मालेगावी तिघा चोरट्यांकडून १७ दुचाकी जप्त

मालेगावी तिघा चोरट्यांकडून १७ दुचाकी जप्त

मालेगाव : धुळे, मालेगाव, वडाळीभोई, चांदवड, चाळीसगाव, बेलदारवाडी, पिलखोड अशा विविध ठिकाणांहून गेल्या तीन-चार महिन्यांपासून दुचाकी चोरणाऱ्या तिघा जणांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख ९५ हजार रूपये किंमतीच्या १७ दुचाकी जप्त करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरातील दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण वाडीले, नरेंद्रकुमार कोळी यांना मिळालेल्या माहितीनुसार छावणी पोलिसांनी रवींद्र उर्फ जाकी दोधा कुवर (१८), मिथून रामदास कुवर (२०), वासुदेव तानाजी कुवर (२२) तिघे रा. चिखलओहोळ या तिघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर तिघांनी विविध ठिकाणाहून १७ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ लाख ९५ हजार रूपये किंमतीचे १७ दुचाकी जप्त केल्या आहेत. तिघेही संशयित चोरटे मोलमजुरी करणारे असून रात्रीच्या वेळेस घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी बनावट चावीच्या अधारे चोरत होते. तसेच चोरलेल्या दुचाकी अल्प दरात विकत होते. दुचाकीच्या नंबर प्लेट, चेसी व इंजिन नंबरमध्ये खाडाखोड केल्याचे उघडकीस आले आहे.

Web Title: 17 bikes were seized from three thieves in Malegaon

टॅग्स :Nashikनाशिक