शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये विवाहिता छळाचे १६३ गुन्हे !

By विजय मोरे | Updated: October 21, 2018 12:14 IST

नाशिक : शहरात जानेवारी ते १५ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये १६३ विवाहित महिला व त्यांच्या कुटुंबियांनी सासरच्यांविरोधात शारीरीक मानसिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत़ माहेरून पैसे आणत नाही, घर, गाडी, फ्लॅट व चारीत्र्याचा संशय ही विवाहिता छळाची सर्वाधिक कारणे आहेत़ विवाहिता छळामध्ये पती, सासू, सासरे, नणंद व सासरचे नातेवाईकांचा सहभाग असल्याचे दाखल गुन्ह्यांवरून समोर आले आहे़

ठळक मुद्देसाडेनऊ महिन्यांचा कालावधी : पैसे, नोकरी, फ्लॅट व चारित्र्याचा संशयावरून सर्वाधिक छळ

नाशिक : शहरात जानेवारी ते १५ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये १६३ विवाहित महिला व त्यांच्या कुटुंबियांनी सासरच्यांविरोधात शारीरीक मानसिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत़ माहेरून पैसे आणत नाही, घर, गाडी, फ्लॅट व चारीत्र्याचा संशय ही विवाहिता छळाची सर्वाधिक कारणे आहेत़ विवाहिता छळामध्ये पती, सासू, सासरे, नणंद व सासरचे नातेवाईकांचा सहभाग असल्याचे दाखल गुन्ह्यांवरून समोर आले आहे़

पोलीस ठाण्यात छळाची फिर्याद देणाऱ्यांमध्ये २० ते ३० या वयोगटातील विवाहितांची संख्या अधिक असून त्याखालोखाल ३० ते ४० वयोगटातील महिला आहेत़ यापैकी बहुतांशी प्रकरणांमध्ये सासरच्यांनी मुलाचे शिक्षण कमी झालेले असतानाही जास्त सांगितले, नोकरी नसताना नोकरीला असल्याचे सांगून फसवणूक केल्याचे म्हटले आहेत़ तर एका प्रकरणामध्ये मुलास एचआयव्ही एड्स असल्याची बाब लपवून ठेवली, विवाहानंतर काही महिन्यांनी पतीचे निधन झाल्यानंतर तुझ्यामुळेच मुलाला एड्स झाल्याचा आरोपही सास-यांनी केल्याचे म्हटले आहे़

पतीस अनैतिक संबंधास विरोध केला, मुलगा झाला नाही मुलीच झाल्या तसेच बळजबरीने अनैसर्गिक शारीरिक संबंध केला जात असल्याची तक्रारही काही विवाहितांनी केली आहे़ तर काही प्रकरणांमध्ये मुलगी आवडली नाही मात्र घरच्यांच्या आग्रहाखातर विवाह करून पत्नीस जाणूनबुजुन शरीरसुखापासून वंचित ठेवल्याचीही तक्रार आहे़ शहरातील अंबड, उपनगर, मुंबई नाका, नाशिकरोड, सातपूर , इंदिरानगर , पंचवटी या पोलीस ठाण्यांमध्ये विवाहिता छळाचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे़अकरा विवाहितांची आत्महत्यापती व सासरच्यांच्या छळास कंटाळून अकरा विवाहितांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत़ त्यात इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत तीन, अंबड, देवळाली कॅम्प व नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी दोन तर म्हसरुळ आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी एक विवाहितेने आत्महत्या केली आहे़ उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका विवाहितेस योग्य वेळी उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले आहेत़या कारणांसाठी विवाहितांचा छळ* पैशांसाठी - ४१* घर, गाडी, प्लॉटसाठी - ३७* कौटुंबिक -२९* नोकरी-व्यवसाय - २३* चारित्र्याचा संशय - २०* मुल होत नाही किंवा मुलगी झाली - ६* आवडत नाही - ३* कर्ज फेडण्यासाठी - ३* खोट्या कारणाने फसवणूक - ३* पतीचे अनैतिक संबंधास विरोध - ३* अनैसर्गिक संबंध - २पोलीस ठाणेनिहाय दाखल गुन्हे* अंबड : ३८* उपनगर : २४* मुंबईनाका : २१* नाशिकरोड : १६* सातपूर : १२* इंदिरानगर : १०* पंचवटी : १०* भद्रकाली : ०८* म्हसरुळ : ०६* गंगापूर : ०६* देवळाली कॅम्प : ०६* सरकारवाडा : ०४* आडगाव : ०२एकूण : १६३

टॅग्स :MolestationविनयभंगNashikनाशिकmarriageलग्नWomenमहिला