शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १६ हजार  घरे अजूनही अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:20 IST

डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील सर्व घरांमध्ये वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर बिजली योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजना आणली आहे. नाशिक परिमंडळातदेखील या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नाशिक ग्रामीण विभागात गटनिहाय कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र जिल्ह्यातील सोळा हजांरापेक्षा जास्त घरांमध्ये अद्यापही वीज पोहचलेलीच नाही

नाशिक : डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील सर्व घरांमध्ये वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर बिजली योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजना आणली आहे. नाशिक परिमंडळातदेखील या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नाशिक ग्रामीण विभागात गटनिहाय कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र जिल्ह्यातील सोळा हजांरापेक्षा जास्त घरांमध्ये अद्यापही वीज पोहचलेलीच नाही. असे असताना टार्गेट कमी करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.  ग्रामीण व शहरी भागातील एकही घर विना वीजजोडणी राहणार नाही, याची दक्षता सौभाग्य योजनेतून घेण्यात येणार आहे. डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत योजनेचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्र्यरेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉइंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे, तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्र्यरेषेवरील कुटुंबे) अवघ्या ५०० रुपयांमध्ये वीजजोडणी मिळणार आहे. जिल्ह्यात १७ हजार ८०८ घरांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे, तर १६ हजार ८६० घरांना अद्याप विजेची  प्रतीक्षा आहे. दारिद्र्यरेषेखालील आणि रेषेवरील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात विद्युतीकरण जोरात सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी नाशिक परिमंडळाच्या दप्तरी नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय विद्युतीकरणाची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.अशी आहे योजना४ग्रामीण व शहरी भागातील एकही घर विना वीजजोडणी राहणार नाही, याची दक्षता सौभाग्य योजनेतून घेण्यात येणार आहे. डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत योजनेचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे) मोफत वीजजोडणीसोबतच एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉइंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे, तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्र्यरेषेवरील कुटुंबे) अवघ्या ५०० रु पयांमध्ये वीजजोडणी मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीजबिलासोबत दहा समान हप्त्यात भरावयाचे आहे. आतापर्यंत विद्युतीकरण न झालेल्या देशभरातील चार कोटी ग्राहकांच्या घरापर्यंत वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली असून, त्यासाठी १६ हजार कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. अतिदुर्गम भागातील घरांचे विद्युतीकरण करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येणार आहे. यातून रोजगाराच्या संधी वाढण्यासोबतच स्त्रियांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत मिळणार आहे.गावे विद्युतीकरण मोजणीची अजब तहागावाचे विद्युतीकरण झाल्याबाबत अजब निष्कर्ष काढला जात आहे. ज्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, शाळा, पाणीपुरवठा योजना यांना वीजपुरवठा करण्यात आला आहे याबरोबरच १० टक्के घरांना वीजजोडणी असेल तर ते गाव विद्युतीकरण झाल्याचे जाहीर केले जाते. दहा टक्केनुसार म्हणजे शंभर घरांचे गाव असेल आणि दहा घरांना वीज दिली तरी ते गाव विद्युतीकरण झाले असे जाहीर केले जाते. अशा प्रकारे विद्युतीकरणाची व्याख्या केली जात असून, या पद्धतीने विद्युतीकरणासाठीच मोहीम सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत जास्तीत जास्त घरांमध्ये वीज पोहचविण्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात दहापटीप्रमाणेच घरांमध्ये वीज पोहचणार आहे.

टॅग्स :electricityवीज