विद्यार्थांच्या समस्या सोडविण्यासाठी १६ मार्गदर्शन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:39 IST2020-08-27T22:33:38+5:302020-08-28T00:39:46+5:30
नाशिक : शहरातील विविध ६० उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थांना येणाऱ्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शहरात तब्बल १६ मार्गदर्शक केंद्र उपलब्ध करून दिले आहेत. या मार्गदर्शन केंद्रावर मार्गदर्शक प्रमुख व सहाय्यक नियुक्त करण्यात आले असून विद्यार्थी व पालकांनी त्यांच्या अडचणीसाठी आपापल्या विभागातील मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे

विद्यार्थांच्या समस्या सोडविण्यासाठी १६ मार्गदर्शन केंद्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील विविध ६० उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थांना येणाऱ्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शहरात तब्बल १६ मार्गदर्शक केंद्र उपलब्ध करून दिले आहेत. या मार्गदर्शन केंद्रावर मार्गदर्शक प्रमुख व सहाय्यक नियुक्त करण्यात आले असून विद्यार्थी व पालकांनी त्यांच्या अडचणीसाठी आपापल्या विभागातील मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे
नाशिक शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या प्रथम फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट व त्यावरील हरकती नोंदविण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या हरकतींवर शिक्षण उपसंचालक निर्णय घेणार असून त्यांनतर अंतिम गुणवत्ता यादी रविवारी (दि.३०) जाहीर होणार आहे. त्यांनतर राबविण्यात येणाºया प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी शहरातील वेगवेगळया भागात १६ मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रांवर विद्यार्थी व पालक त्यांच्या समस्यांचे निराकरण करता येणार आहे.शहरातील मार्गदर्शन केंद्रेव्ही. एन. नाईक कनिष्ठ महाविद्यालय, कॅनडा कॉर्नर ४सीएमसीएस महाविद्यालय, गंगापूर रोड ४बीवायके महाविद्यालय, कॉलेजरोड भोसला महाविद्यालय, गंगापूररोड ४पंचवटी महाविद्यालय, पंचवटी ४ए. पी. पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ४केएसकेडब्लू महाविद्यालय, सिडको. ४सुखदेव कनिष्ठ महाविद्यालय, इंदिरानगर ४बिटको महाविद्यालय, नाशिकरोड ४एस. व्ही. के. टी महाविद्यालय, देवळाली कॅम्प ४शासकिय तंत्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालय ४जी.डी. सावंत महाविद्यालय, पाथर्डी फाटा ४एस. एम. आर. के. महाविद्यालय, कॉलेजरोड ४आर. के. कलानी कनिष्ठ महाविद्यालय ४भुजबळ अॅकेडमी आॅफ सायन्स, कॉमर्स ४पुरूषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय