जिल्ह्यात १५९ नवीन कोरोनाबाधित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 01:29 IST2021-07-02T01:28:12+5:302021-07-02T01:29:01+5:30

जिल्ह्यात गुरुवारी (दि. १) एकूण १८४ कोरोनामुक्त झाले असून, १५९ रुग्ण नवीन बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात एकूण ५ जणांचा बळी गेला असून, त्यात ४ बळी नाशिक ग्रामीणचे तर १ बळी नाशिक मनपा क्षेत्रातील आहे.

159 new corona affected in the district! | जिल्ह्यात १५९ नवीन कोरोनाबाधित!

जिल्ह्यात १५९ नवीन कोरोनाबाधित!

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. १) एकूण १८४ कोरोनामुक्त झाले असून, १५९ रुग्ण नवीन बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात एकूण ५ जणांचा बळी गेला असून, त्यात ४ बळी नाशिक ग्रामीणचे तर १ बळी नाशिक मनपा क्षेत्रातील आहे.

जिल्ह्यात गुरुवारी गेलेल्या ५ बळींमुळे एकूण बळींची संख्या ८,३५४ वर गेली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील उपचारार्थींची संख्या २,४४३ पर्यंत खाली आली असली तरी प्रलंबित अहवालांची संख्या अद्यापही १,०६६ वर आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचा दर गत आठवड्यापासून ९७ टक्क्यांवरच कायम असून, गुरुवारीदेखील हा दर ९७.२६ टक्क्यांवर कायम आहे.

Web Title: 159 new corona affected in the district!