जिल्ह्यात १५९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST2021-02-05T05:37:37+5:302021-02-05T05:37:37+5:30
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.३) एकूण १५१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १३८ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. ...

जिल्ह्यात १५९ कोरोनामुक्त
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.३) एकूण १५१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १३८ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक जिल्हा एकाचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २०५४ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार २३९ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १२ हजार ९८१ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत तर १३२५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.२० वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.८९, नाशिक ग्रामीण ९६.२९, मालेगाव शहरात ९३.१४, तर जिल्हाबाह्य ९५.०४असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ५ लाख २ हजार ८३१ असून, त्यातील ३ लाख ८५ हजार ९६०रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १६ हजार २३९ रुग्ण बाधित आढळून आले असून, ६३२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.