जिल्ह्यात १५४ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 01:15 IST2021-01-02T00:04:12+5:302021-01-02T01:15:43+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १) एकूण २२७ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, १५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल नाशिक शहरात ३ तर ग्रामीणला एक याप्रमाणे चौघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या १९७२ वर पोहाेचली आहे.

जिल्ह्यात १५४ रुग्ण कोरोनामुक्त
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १) एकूण २२७ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, १५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल नाशिक शहरात ३ तर ग्रामीणला एक याप्रमाणे चौघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या १९७२ वर पोहाेचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १० हजार ३४६ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ६ हजार ६३२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १९७२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.६३ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.१३, नाशिक ग्रामीण ९६.१३, मालेगाव शहरात ९२.९६, तर जिल्हाबाह्य ९३.६९ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १९७२ बाधित रुग्णांमध्ये ९७८ रुग्ण नाशिक शहरात, ७७० रुग्ण नाशिक ग्रामीणला, १७५ रुग्ण मालेगावमध्ये, तर ४९ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख ३७ हजार ७८२ असून, त्यातील ३ लाख २४ हजार ३३८ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १० हजार ३४६ रुग्ण बाधित आढळून आले असून, ४ हजार ८४० रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.