जिल्ह्यात १५१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 01:23 AM2021-07-26T01:23:17+5:302021-07-26T01:24:38+5:30

जिल्ह्यात रविवारी (दि.२५) ११३ नवीन रुग्ण दाखल झाले असून, १५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८४९४ पर्यंत पोहोचली आहे.

151 corona free in the district | जिल्ह्यात १५१ कोरोनामुक्त

जिल्ह्यात १५१ कोरोनामुक्त

Next

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.२५) ११३ नवीन रुग्ण दाखल झाले असून, १५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८४९४ पर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यात बाधित आढळून आलेल्या ११३ नागरिकांमध्ये ६६ नागरिक नाशिक ग्रामीणचे, ४३ नाशिक मनपाचे, तर ४ जिल्हाबाह्य रुग्ण आहेत. जिल्ह्यातील कोरोनामुक्तचे प्रमाण ९७.५७ टक्क्यांवर पोहोचले असून, ६४५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील उपचारार्थींची संख्या १२८९ पर्यंत पोहोचली असून, त्यात ६४५ नाशिक मनपा क्षेत्रातील, ५८५ नाशिक ग्रामीणचे, ५३ मालेगाव मनपातील, तर ६ जिल्हाबाह्य रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: 151 corona free in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app