जिल्ह्यात वर्षभरात १,४३१ बालके कुपोषण मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:07+5:302021-05-08T04:14:07+5:30

महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत गेल्या वर्षाच्या तुलनेत कुपोषणाचा आढावा ...

1,431 children are malnutrition free in the district during the year | जिल्ह्यात वर्षभरात १,४३१ बालके कुपोषण मुक्त

जिल्ह्यात वर्षभरात १,४३१ बालके कुपोषण मुक्त

महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत गेल्या वर्षाच्या तुलनेत कुपोषणाचा आढावा घेतला असता, जिल्ह्यात मध्यम गंभीर कुपोषीत बालकांची संख्या २,४१४ इतकी तर तीव्र गंभीर बालकांची संख्या ३७२ इतकीच असल्याचे निदर्शनास आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मध्यम गंभीर बालकांच्या संख्येत ९९३ने तर तीव्र गंभीर बालकांमध्ये ४३८ने संख्या कमी झाली आहे.

चौकट===

असा आहे नाशिक पॅटर्न

कुपोषण मुक्तीच्या पॅटर्नमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने कोरोना काळात घरोघरी जाऊन बालकांना नियमित गरम ताजा पोषण आहार, अमृत आहार, तसेच पोषणकल्पवडी व मायक्रोन्युट्रीएंट हा अतिरिक्त आहार वाटप केला होता. ग्रामपंचायतींवर गावातील कुपोषित बालकांची जबाबदारी सोपवून एक मूठ पोषण आहार ही अभिनव योजना राबविण्यात आली आहे.

Web Title: 1,431 children are malnutrition free in the district during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.