पिंपळगाव शहरात चार दिवसांत १४१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 00:12 IST2021-04-10T21:19:10+5:302021-04-11T00:12:32+5:30

पिंपळगाव बसवंत : शहरात गेल्या चार दिवसांत १४१ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णसंख्या १७३ झाली आहे, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

141 patients in Pimpalgaon city in four days | पिंपळगाव शहरात चार दिवसांत १४१ रुग्ण

 रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना रुग्णांच्या उपचारासाठी धावपळ करत असलेले रुग्णांचे नातेवाईक.

ठळक मुद्दे ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत.

पिंपळगाव बसवंत : शहरात गेल्या चार दिवसांत १४१ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णसंख्या १७३ झाली आहे, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा कहर थांबवण्यासाठी शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. तरीदेखील पिंपळगाव शहरात दरदिवशी मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांनाही जीव मुठीत धरून ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी धावपळ करावी लागत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. प्रशासनाने लक्ष देऊन रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी व ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.
चौकट...

बुधवार ३७ रुग्ण
गुरुवार २३ रुग्ण
शुक्रवार ४७ रुग्ण
शनिवार ३४ रुग्ण
चार दिवसांत एकूण १४१ रुग्ण

Web Title: 141 patients in Pimpalgaon city in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.