शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

आयुक्तालयाच्या कोरोना सेलद्वारे १४ हजार ‘ई-पासेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 18:46 IST

भारतातील विविध राज्यांत तसेच केंद्रशासित प्रदेशात जाणाºयया नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी आपली वेबलिंक आता अपडेट केली आहे.

ठळक मुद्देअत्यावश्यक कारणांसाठी प्रवासाची मुभा

नाशिक : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारकडून लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. यामुळे काही अत्यावश्यक कारणांसाठी तसेच अपात्कालीन स्थितीत शहरासह जिल्ह्यात किंवा जिल्हाबाहेर प्रवास करण्याचा प्रसंग ओढावल्यास नाशिककरांची गैरसोय होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कोरोना विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षातून सुमारे १४ हजार ५५९ ‘ई-पासेस’ अद्याप वितरित करण्यात येऊन नागरिकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला गेला.लॉकडाउनच्या पाशर््वभूमीवर कोरोना कक्षाचे कामकाज २४ तास सुरू आहे. त्यासाठी २ पोलीस निरीक्षक, १७ सहायक पोलीस निरीक्षक तसेच ६३ कर्मचारी असे एकूण ८२ अधिकारी-कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात आला आहे. या कक्षातून गरजूंना तत्काळ ई-पासेसद्वारे प्रवासाची परवानगी आवश्यक माहिती संकलित करताच दिली जाते. यासाठी नागरिकांना कोरोना कक्षाचे विशेष संपर्क क्रमांक (०२५३-२०३५२३३/ ९८२३७८८०७७/ ८८८८८०५१००) तसेच ई-मेल अ‍ॅड्रेस देण्यात आला आहे.कोरोना कक्षाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेल्या परवानग्यांमध्ये व्हॉटस्अ‍ॅप हेल्पलाईनच्या १२ हजार ५५ वेबलिंकच्या १ हजार ४३७ , तर औद्योगिक १ हजार १६ परवानग्यांचा समावेश आहे. परवानगीसाठी थेट पोलीस आयुक्तालयात धाव घेण्याची नागरिकांना आवश्यकता नसून या कोरोना कक्षात संपर्क साधताच योग्य ती माहिती देत संबंधितांचे प्रबोधन तसेच आवश्यक कारणासाठी परवानगीदेखील दिली जाते. यासह शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक मंडळे तसेच संघटनांना गरजूंपर्यंत अन्नधान्य वाटप करण्यासाठीही परवानग्या प्रदान करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.दरम्यान, भारतातील विविध राज्यांत तसेच केंद्रशासित प्रदेशात जाणाºयया नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी आपली वेबलिंक आता अपडेट केली आहे. लॉकडाउनमुळे परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील रहिवासी नाशिकमध्ये अडकले असतील, तर त्यांनी घरी जाण्यासाठी कोरोना कक्षासह वेबलिंकद्वारे संपर्क अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस