१३६ नळजोडण्या मनपाकडून खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:23 IST2018-03-10T00:23:05+5:302018-03-10T00:23:05+5:30
नाशिक : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने १३६ ठिकाणी अनधिकृतपणे आढळून आलेल्या नळजोडण्या खंडित करण्याची कारवाई केली.

१३६ नळजोडण्या मनपाकडून खंडित
नाशिक : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने १३६ ठिकाणी अनधिकृतपणे आढळून आलेल्या नळजोडण्या खंडित करण्याची कारवाई केली असून, आतापर्यंत ८६ नळजोडणीधारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेने शहरात अनधिकृत नळजोडणीधारकांची दि. २२ फेबु्रवारीपासून शोधमोहीम सुरू केलेली आहे. त्यापूर्वी महापालिकेने अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी अभय योजना राबविली होती. परंतु त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर महापालिकेने शोधमोहीम सुरू केली. आतापर्यंत १३६ ठिकाणी नळजोडणी खंडित करण्यात आली असून, त्यात पूर्व विभागातील १२, पश्चिममधील ४५, सिडकोतील ३९, पंचवटीतील १९, नाशिकरोडमधील ९ आणि सातपूरमधील १२ नळजोडण्यांचा समावेश आहे. यापुढेही अनधिकृत ळजोडणीधारकांविरुद्ध मोहीम सुरूच राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी सांगितले.