शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

त्र्यंबकेश्वर तालुक्यात नवीन १३ गाव पाणीपुरवठा योजना मंजुर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:57 PM

त्र्यंबकेश्वर : तालुक्यासाठी आता पुनश्च नव्याने १३ गाव पाणीपुरवठा योजना ंमंजूर झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून वाड्यापाडे , गावे देखील टंचाई मुक्त होणार आहेत.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यासाठी आता पुनश्च नव्याने १३ गाव पाणीपुरवठा योजना ंमंजूर झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून वाड्यापाडे , गावे देखील टंचाई मुक्त होणार आहेत.तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत देखील नव्याने २२ गावांचा समावेश करण्यात आल्याने येत्या वर्ष दिड वर्षात तालुका जलयुक्त शिवार योजनेतुन सन२०१४/१५ साठी १८ गावे, सन १५-१६ साठी ९ गावे, सन २०१७-१८ साठी पाच गावे असे मिळुन एकुण ३२ गावे यापुर्वीच जलयुक्त शिवाराने शेतीसाठी उपयुक्त झाली आहेत. आता नव्याने सन २०१८-१९ साठी नव्याने २२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी प्राथमिक तयारी सुरु असुन ग्रामीण पाणी पुरवठा विभाग किंवा महाराष्ट्र जीवन प्राधीकरण या विभागामार्फत या १३ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होतील. तथापि ही गावे धरणांपासुन दुर असली तरी परक्युलेशन परिसरात विहीरीस पाणी लागेल अशा ठिकाणी त्यानंतरच १३ गावांना कोणकोणत्या ठिकाणी पाणी लागेल. याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाकडुन जागेबाबत शिफारस केल्यावरच योजनेसाठी विहीर घेण्यात येईल. तत्पुर्वी सर्व गावांच्या योजनांचे एस्टीमेट करणे ते एस्टीमेट मंजुर करु न घेणे योजनेचे प्लॅन एस्टीमेटला प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर निधी मंजुर होईल. शेवटी तांत्रिक मंजुरी मिळाल्यावरच प्रत्यक्षात कामे सुरु होतील. त्यामुळे पुढच्या वर्षा पर्यंत ही कामे पुर्ण होतील की नाही हे आज तरी सांगता येत नाही. तथापि कामे पुर्ण झाल्यानंतर मात्र योजना यशस्वी झाल्यास तालुका ख-या अर्थाने टँकरमुक्त होईल यात शंका नाही.----------------------------त्र्यंबकेश्वर अति पावसाचा तालुका. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या खालोखाल गणला जातो. दरवर्षी २२०० ते २५०० मिमि पर्यंत पावसाची सरासरी साधारणपणे असते. तथापि तालुक्याची भौगोलिक परिस्थिती डोंगराळ भागाची आहे. उंच सखल डोंगरावरु न पडलेले पाणी डोंगर उतारावरु न वाहन जाते. तालुक्यात सन २००५-०६ पासुन आतापर्यंत १०० वर योजना झाल्या असतील पण त्यातील काही योजना पुर्ण झाल्या तर ११योजना भ्रष्टाचारात वाहुन गेल्या. अशा योजनांच्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारत निर्माण योजना कार्यक्र मात पुर्वी या योजना राबविल्या. आता फक्त नाव बदलले.आता राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत नव्याने या योजना राबविण्यात येत आहेत.--------------------------जलयुक्त शिवार योजनेमुळे तालुक्यातील ५४ गावे जलयुक्त शिवाराने समृध्द होणार असल्याने एकीकडे टँकरमुक्त गावे तर दुसरीकडे जलयुक्त शिवाराच्या गावांनी शेती समृध्द होणार आहे. शेतीचे सपाटीकरण शेतीत कायम स्वरु पी ओलावा परिणामी तिनही हंगामात बाराही महिने वेगवेगळी पिके घेता येतील. कायम टंचाईच्या खाईत सापडलेल्या गावांना टंचाई मुक्त करण्याचा आमचा मानस आहे.- मधुकर मुरकुटे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

टॅग्स :Nashikनाशिक