जिल्ह्यातील १३ न्यायाधीशांच्या बदल्या
By Admin | Updated: April 30, 2017 01:37 IST2017-04-30T01:37:44+5:302017-04-30T01:37:53+5:30
नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील ४७३ न्यायाधीशांच्या बदल्या केल्या आहे़

जिल्ह्यातील १३ न्यायाधीशांच्या बदल्या
नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील ४७३ न्यायाधीशांच्या बदल्या केल्या असून, त्यामध्ये १३१ जिल्हा न्यायाधीश, १६१ वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश, तर १८१ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा समावेश आहे़ या बदल्यांमध्ये नाशिक जिल्ह्णातील १३ न्यायाधीश बदली झाली असून, १७ न्यायाधीश बदलून आले आहेत़ मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्टार जनरल मंगेश पाटील यांनी या बदल्या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत़
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील एऩ के.ब्रह्मे यांची पुणे जिल्ह्णातील खेड राजगुरूनगर, एम़ एस़ पठाण लातूर जिल्ह्णातील अहमदपूर, मालेगावमधील एस़एसख़डांगळे यांची नागपूर, तर आऱएस़तिवारी यांची जालना येथे बदली करण्यात आली आहे़ नाशिक जिल्हा न्यायालयात पुणे येथून एऩजी. गिमेकर, मुंबईहून एम़एस़बोधनकर यांची, तर मुंबई येथील ए़एस़महात्मे यांची मालेगाव व लातूर जिल्ह्णातील अहमदपूर येथील एस़ सी़ मगरे यांची निफाड येथे बदली करण्यात आली आहे़
नाशिक जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वि़ ऱ अगरवाल यांची यवतमाळ जिल्ह्णातील पूसद, ए़ एच़ काशीकर यांची मुंबई, तर पी़ सी़ काळे यांची पुणे येथे बदली झाली आहे़ नाशिक जिल्हा न्यायालयात मुंबईहून चार न्यायाधीश बदलून आले असून, त्यामध्ये व्ही़बीग़ोरे, एस़ टी़ डोके, आऱ व्ही़ भक्ता व डी़ एल़ भागवत यांचा समावेश आहे़
जिल्हा न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे़ बी़ गोयल यांची अकोला जिल्ह्णातील मूर्तीजापूर, नाशिकरोड न्यायालयातील ए़ डी़ वामन यांची यवतमाळ जिल्ह्णातील वणी, मालेगाव न्यायालयातील ए़ एच़ बेग यांची नागपूर, सिन्नर न्यायालयातील एस़ एऩ रतकंठवार यांची परभणी, दिंडोरी न्यायालयातील एस़ व्ही़ इनामदार यांची रत्नागिरी जिल्ह्णातील खेड, कळवण न्यायालयातील एस़पी़पैठणकर यांची नांदेड जिल्ह्णातील हडगाव येथे बदली करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)