मालेगावसह परिसरात १३ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:28 IST2020-07-27T22:22:38+5:302020-07-28T00:28:34+5:30
मालेगाव : शहर, परिसरातील ९३ जणांच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठविले असता त्यातील १३ जण कोरोनाबाधित आढळून आले, तर ८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

मालेगावसह परिसरात १३ बाधित
मालेगाव : शहर, परिसरातील ९३ जणांच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठविले असता त्यातील १३ जण कोरोनाबाधित आढळून आले, तर ८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संगमेश्वरातील पवननगर येथील ४८ वर्षीय इसम, आंबेडकरनगर-श्रीरामनगर येथील २८ वर्षीय तरुण, शिवाजी पुतळ्याजवळील २४ वर्षीय तरुण, संगमेश्वर जुना होळी चौकातील २६ वर्षीय तरुण, महेशनगरमधील ५० आणि २५ वर्षीय इसम तर तालुक्यातील झोडगे येथील ३५ वर्षीय इसम बाधित मिळून आले आहेत. याशिवाय झोडगे येथील राम मंदिर भागातील २१ वर्षीय महिला, कळवाडीच्या होळी चौकातील ६२ वर्षीय इसम, सोयगावच्या प्लॉट नं. ५ मधील ५५ वर्षीय इसम, सोयगावच्या तुळजाभवानी मंदिराजवळील हॅप्पी हाऊसमधील २८ वर्षीय महिला, कलेक्टरपट्टा येथील शिवाजी चौकातील ४० वर्षीय महिला तर तालुक्यातील जळगाव येथील ३७ वर्षीय इसम कोरोनाबाधित मिळून आला.