१२७ भ्रमणध्वनी मनोरे सील
By Admin | Updated: March 23, 2017 00:22 IST2017-03-23T00:22:24+5:302017-03-23T00:22:36+5:30
मालेगाव : महसूल विभागाची थकबाकी असलेले १२७ मोबाइल टॉवर व २५ खडीक्रशर येथील महसूल प्रशासनाने सील केले आहेत. संबंधितांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे.

१२७ भ्रमणध्वनी मनोरे सील
मालेगाव : महसूल विभागाची थकबाकी असलेले १२७ मोबाइल टॉवर व २५ खडीक्रशर येथील महसूल प्रशासनाने सील केले आहेत. संबंधितांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे. महसूल विभागाची थकीत वसुली वसूल करण्यासाठी प्रांताधिकारी अजय मोरे यांनी कंबर कसली आहे. तहसीलदारांना त्यांनी थकबाकीदारां-कडून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मालेगाव तालुक्यातील विविध कंपन्यांचे १५७ मोबाइल टॉवर आहेत. संबंधित कंपन्यांकडे सुमारे ५८ लाखांची थकबाकी होती. यापैकी २५ लाख वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित थकबाकी वसूल करण्यासाठी १२७ टॉवर सील करण्यात आले आहेत. महसूल प्रशासनाने गौणखनिज, बिनशेतसारा, शेतजमिनी यासह विविध थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे. तसेच तालुक्यात बेकायदेशीरीत्या सुरू असलेल्या २५ खडीक्रशरधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. २५ खडीक्रशरचालकांकडे २९ लाख ९२ हजार ३४७ रुपयांची गौणखनिज थकबाकी आहे. पर्यावरण विभागाची परवानगी नसताना बेकायदेशीर खडीक्रशर सुरू आहेत. एक ब्रास खडीनिर्मितीसाठी हे यंत्र १८ युनिट वीज वापर करते. त्यानुसार क्रशरवरील मीटरची रीडिंग घेऊन गौणखनिज वसुलीची
नोटीस बजावण्यात आली आहे. विनापरवानगी सुरू असलेले खडीक्रशर तातडीने बंद करावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. (प्रतिनिधी)