शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात १२६ नामांकन दाखल

By admin | Updated: September 26, 2014 23:27 IST

राजी-नाराजी, बंडखोरीला उधाण : अर्ज भरण्याची आज अखेरची तारीख

नाशिक : युती - आघाडीचे फिस्कटल्याने बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांच्या राजी-नाराजीचे जाहीर प्रदर्शन व उघड उघड बंडखोरी करीत, तर काही ठिकाणी शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून अर्ज भरण्याच्या मुदतीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातून १२६ अर्ज दाखल करण्यात आले. गेल्या सहा दिवसांत १६९ अर्ज दाखल करण्यात आले असून, शनिवारी शेवटचा दिवस आहे. गुरुवारी घटस्थापनेच्या मुहूर्ताला सेना-भाजपा युती व कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत घटस्फोट झाल्यानंतर सर्वपक्षीय इच्छुकांमध्ये निवडणुकीची ऊर्मी आणखीनच उफाळून आली. मतविभाजन, जात-समाज व वैयक्तिक हितसंबंधांचे आडाखे बांधत प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीवर दावा केला, तर जागावाटपापूर्वी स्वबळाची भाषा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना काही जागांवर उमेदवारच नसल्याने त्यांनी अन्य पक्षांतील नाराजांना हेरून उमेदवारीचे बोट चाटवले. त्यामुळे शुक्रवारी कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर जिल्ह्णात राजकीय हालचाली गतिमान होऊन राजकारणाचे फासे वेगाने फिरले. त्यातूनच राजी-नाराजी, बंडखोरी व पक्षांतराची चर्चा झडली. अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी प्रामुख्याने कॉँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित, मनसेचे वसंत गिते, नितीन भोसले, सेनेचे धनराज महाले, अनिल कदम, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी महापौर दशरथ पाटील आदिंनी नामांकन दाखल केले. शुक्रवारी दिवसभरातून १२६ अर्ज दाखल करण्यात आले. १७१ व्यक्तींनी ३१२ अर्ज नेले. आजवर ८७२ व्यक्तींनी १५९२ अर्ज नेले आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून, सेना-भाजपाने अजूनही उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. त्याचप्रमाणे कॉँग्रेस व राष्ट्रवादीचेही काही ठिकाणचे उमेदवार ठरणे बाकी आहे. त्यामुळे उद्या उमेदवारीसाठी झुंबड उडणार आहे.