मेमध्ये बारा हेक्टर शेतपिकांचे नुकसान
By Admin | Updated: May 31, 2014 02:04 IST2014-05-31T00:14:46+5:302014-05-31T02:04:31+5:30
नाशिक : जिल्ात एप्रिल तसेच मे महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची आकडेवारी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे़ यामध्ये मे महिन्यात केवळ १२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे़

मेमध्ये बारा हेक्टर शेतपिकांचे नुकसान
नाशिक : जिल्ात एप्रिल तसेच मे महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची आकडेवारी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे़ यामध्ये मे महिन्यात केवळ १२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे़
एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात निफ ाड व येवला तालुक्यातील ४० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे़ निफ ाड तालुक्यात २१, तर येवला तालुक्यात १९ हेक्टर असे हे क्षेत्र आहे़ मात्र मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेत जास्त पाऊस असूनही यामध्ये पिकांचे नुकसान केवळ १२ हेक्टरवर झाले आहे़ यामध्ये कळवण, सिन्नर, निफ ाड या तालुक्यांचा सामावेश आहे़
यापूर्वी २८ फे बु्रवारी रोजी झालेल्या गारपिटीत नऊ तालुक्यांतील १२० गावांतील ११ हजार १८० हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान झाले. यामध्ये द्राक्षबागा, गहू, कांदा, हरबरा, डाळींब, स्ट्रॉबेरी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते़ मार्चमध्येही हा आकडा वाढत गेला होता़ यातील काही नुकसानग्रस्त शेतकर्यांना अद्याप त्याची नुकसानभरपाई मिळालेली नसून पीक नुकसानीची आकडेवारी मात्र वाढत आहे़
चौकट
पॉलिहाऊसला मदत नाही
जिल्ात अनेक शेतकर्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत पॉलिहाऊस तसेच ग्रीनहाऊसची उभारणी केली आहे़ वादळ वार्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पॉलीहाऊस उन्मळून पडले आहेत, तर अनेक पॉलिहाऊसचे कागद फ ाटले आहेत़ या शेतकर्यांनी याची नुकसानभरपाईची मागणी केली आहे; परंतु पॉलिहाऊस उभारणीसाठी शासनाचे अनुदान घेतले गेले असल्याने पॉलिहाऊसला नुकसानभरपाई देता येणार नाही, असे कृषी अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे़