जिल्ह्यात ११७७ बाधित कोरोनामुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 01:35 IST2021-05-24T01:34:31+5:302021-05-24T01:35:18+5:30

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १,१०३ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर १,१७७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३२ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४,३७१वर पोहोचली आहे.

1177 affected corona free in the district | जिल्ह्यात ११७७ बाधित कोरोनामुक्त 

जिल्ह्यात ११७७ बाधित कोरोनामुक्त 

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १,१०३ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर १,१७७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३२ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४,३७१वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३५४ तर नाशिक ग्रामीणला ७२० आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ७६ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ९, ग्रामीणला २२, मालेगाव मनपाला २ असा एकूण ३३ जणांचा बळी गेला आहे. 
ग्रामीणला बळी अधिक
जिल्ह्यात मृत्यूंच्या संख्येत सातत्याने शहरच आघाडीवर राहात होते. मात्र, गत पंधरवड्यापासून ग्रामीणचा बळींचा आकडा शहरापेक्षा अधिक राहू लागला आहे. रविवारीही ग्रामीणमधील मृतांची संख्या २२ आहे.

Web Title: 1177 affected corona free in the district