शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

११ संशयित ताब्यात : अर्धा डझन कट्टयांसह आठ मॅग्जीन, ३२ काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 19:57 IST

ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्याने तालुक्यांमधील गावपातळीवर कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह निफाड उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांना अवैध शस्त्रे बाळगणारे तसेच तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. 

ठळक मुद्देमध्यप्रदेशमधून गावठी पिस्तुलांची तस्करी उधळलीग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सतर्कता

नाशिक : आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण पोलिसांना काही तालुक्यांमध्ये अवैध शस्त्रास्त्रांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधिक्षकांकडून देण्यात आले होते. लासलगावात एका संशयिताला पोलिसांनी छापा टाकून अटक केली असता त्याच्याकडून एक देशी पिस्तुलसह पाच काडतुसे आढळून आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी छडा लावत तब्बल ११ संशयित आरोपींना गावठी कट्टयांच्या खरेदी-विक्रीप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६ गावठी पिस्तुलांसह ८ मॅग्जीनसह ३२ जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.मालेगाव, चांदवड, येवला, लासलगाव या तालुक्यांमधील पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी तपासचक्रे फिरविली. मिळालेल्या गुप्त माहितीच्याअधारे लासलगावातून संशयित विपुल यमाजी आहिरे यास एरिगेशन कॉलनीमध्ये छापा टाकून अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांनी गावठी पिस्तुल व पाच काडतुसे मिळून आली. त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने गावठी पिस्तुल देणारा मध्यप्रदेशमधील म्होरक्या तसेच अन्य खरेदीदारांची माहिती पोलिसांकडे उघड केली. यावरुन तांबे यांनी त्वरित सहायक निरिक्षक राहुल वाघ, उपनिरिक्षक रामकृष्ण सोनवणे, हवालदार भागवत पवार, दौलत ठोंबरे आदींचे पथक तयार करुन गावठी पिस्तुलांची तस्करीची साखळी खिळखिळी करण्याच्या सुचना केल्या. पोलिसांनी सापळा लावून संशयित संतोष ठाकरेकडून (रा.विंचुर) दोन गावठी पिस्तुल, १४ काडतुसे, केशव माधव ठोंबरे (रा.पिंपळद) याच्याकडून एक गावठी कट्टा व चार काडतुसे तसेच संशयित सागर वाघकडू एक गावठी कट्टा व दोन काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. एकुण ११ संशयितांना न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.एजंट, हेल्परांच्याही बांधल्या मुसक्यागावठी पिस्तुल व काडतुसे बाळगणाऱ्या वरील चौघांच्या संपर्कात राहून संभाव्य खरेदीदार शोधून देणे तसेच पिस्तुलांच्या वाहतुकीसाठी मदत करणारे संशयित दिपक पोळ, पंकज चंद्रकांत वानखेडे, विनोद सोपान तांबे, अजीम अल्ताफ शषख, करन जेऊघाले, पवन आनंद नेटारे यांच्याही मुसक्या बांधण्यास पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्यात पोलिसांना सराईत गुन्हेगार सायमन ऊर्फ पापा पॅट्रीक मॅनवेलसह मध्यप्रदेशमधील उमर्टी गावातून देशी पिस्तुल, काडतुसांचा पुरवठा करणारा म्होरक्या शेखर भाई यांना अटक करण्याचे आव्हान आहे.ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सतर्कताग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्याने तालुक्यांमधील गावपातळीवर कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह निफाड उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांना अवैध शस्त्रे बाळगणारे तसेच तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा ग्रामीण पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून कायदासुव्यवस्था बिघडविणाऱ्या संभाव्य समाजकंटक पोलिसांच्या रडारवर असल्याचे सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशgram panchayatग्राम पंचायतMalegaonमालेगांव