केटीएचएम महाविद्यालयाला ११ लाखांची शिष्यवृत्ती
By Admin | Updated: May 29, 2014 00:53 IST2014-05-29T00:38:14+5:302014-05-29T00:53:37+5:30
नाशिक : पुणे विद्यापीठाच्या विविध योजनांतर्गत मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाला ११ लाख ३४ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तींचे धनादेश प्राप्त झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी दिली.

केटीएचएम महाविद्यालयाला ११ लाखांची शिष्यवृत्ती
नाशिक : पुणे विद्यापीठाच्या विविध योजनांतर्गत मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाला ११ लाख ३४ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तींचे धनादेश प्राप्त झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी दिली.
पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील एकूण १०९ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एकूण ४ लाख ८६ हजारांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी ८७ हजारांची तर पुणे विद्यापीठ गुणवंत श्ष्यिवृत्ती योजनेअंतर्गत ४ लाख ८६ हजारांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ७५ हजारांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.