११ पोलिसांचा महासंचालक पदकाने होणार गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:12+5:302021-02-05T05:39:12+5:30
नाशिक : पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्तालयातील ११ अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक पदकाने ...

११ पोलिसांचा महासंचालक पदकाने होणार गाैरव
नाशिक : पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्तालयातील ११ अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हवालदार, नाईक यांचा समावेश आहे. क्लिष्ट गुन्ह्यांचा योग्य पद्धतीने तपास करत परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून गुन्हे उघडकीस आणल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट - १चे पोलीस निरीक्षक आनंदा महादू वाघ यांच्यासह प्रभाकर घाडगे, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, सहायक उपनिरीक्षक अनिल भालेराव, भागिरथ हांडोरे, राजेंद्र ठाकरे, हवालदार विष्णू उगले, सुरेश माळोदे, प्रभाकर कोल्हे, देवराम सुरुंगे, भारत पाटील यांना मंगळवारी (दि. २६) ७१व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या जाहीर समारंभात पोलीस महासंचालक यांच्या सन्मान चिन्हाने जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. पंधरा वर्षांच्या सेवेत या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट सेवा बजावल्याने त्यांच्या कर्तृत्वाचा हा सन्मान असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले.