‘सीबीएसर्ई’च्या दहावीत निहारिका, मिताली टॉपर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:57 IST2018-05-30T00:57:45+5:302018-05-30T00:57:45+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी मारली असून सिम्बॉयसीस स्कूलची निहारिका कुटे आणि आर्मी पब्लिक स्कूलच्या मिताली भट्टाड यांनी यावर्षी नाशिक शहरातून टॉपर्स होण्याचा बहुमान मिळवला आहे. दोघींनीही ९८ टक्के गुण मिळवले असून इतर शाळांमध्येही बहुतांशी मुलींनीच प्रथम क्रमांक मिळवला आहे.

‘सीबीएसर्ई’च्या दहावीत निहारिका, मिताली टॉपर्स
नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी मारली असून सिम्बॉयसीस स्कूलची निहारिका कुटे आणि आर्मी पब्लिक स्कूलच्या मिताली भट्टाड यांनी यावर्षी नाशिक शहरातून टॉपर्स होण्याचा बहुमान मिळवला आहे. दोघींनीही ९८ टक्के गुण मिळवले असून इतर शाळांमध्येही बहुतांशी मुलींनीच प्रथम क्रमांक मिळवला आहे.
सिम्बॉसीसची निहारिका आणि आर्मी पब्लिक स्कूलची मिताली यांच्यापाठोपाठ दिल्ली पब्लिक स्कूलमधील वैदेही सिन्हा हिने ९७.४ टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्र मांक मिळवला नाशिक केंब्रिज शाळेची अनुष्का कुलकर्णी हिने ९६.२ टक्के गुणांसह प्रथम आली असून, देवळाली केंद्रीय विद्यालय १ मधून कल्याणी नायर पहिली आली आहे. किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल शाळेतही गुणवंती गायकवाड हिने प्रथम क्र मांक पटकावला आहे. सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी प्राप्त नऊ शाळांच्या निकालांपैकी सात शाळांमध्ये मुलींनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली आहे, तर कळवणच्या शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रीनित अहेरने ९४.२० टक्के व नेहरूनगर येथील केंद्रीय विद्यालयातील आयुष कुमार याने ९४.८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.