शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शहरात आज नवे १०८ कोरोनाबाधित; सहा रूग्णांचा दिवसभरात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 21:29 IST

महापालिका आरोग्य प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना करत असले तरीदेखील दाट लोकवस्तीमध्ये कोरोनाचा झालेला शिरकाव ही मोठी समस्या बनली आहे. नाशिक शहरातील पंचवटी, जुने नाशिक, वडाळागाव, पखालरोड, नाशिकरोड या भागात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे

ठळक मुद्दे०४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहे६४३ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत.नाशिक महापालिकेतील १ हजार १५९ रुग्ण

नाशिक : शहर व परिसरात सातत्याने कोरोनाचा कहर अधिकाधिक रौद्रावतार धारण करू लागला आहे. एकीकडे कोरोनाग्रस्तांचा आकडा आणि रुग्णांचा मृत्यूचा आकडा वाढत असताना दुसरीकडे मात्र बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दीदेखील कायम आहे. रविवारी (दि.२१) महापालिका हद्दीत तब्बल १०८ नवे कोरोनाबाधित आढळून आले तर ६ रूग्ण मृत्यूमुखी पडल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली. जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता पावणे तीन हजार अर्थात २ हजार ७१६ इतका झाला आहे. यामध्ये नाशिक महापालिकेतील १ हजार १५९ रुग्ण तर मालेगाव मनपामधील ९२९ आणि नाशिक ग्रामिण मधील ५४४ आणि जिल्हा बाह्य ८४ रुग्णांचा समावेश आहे.शहर व परिसरात महापालिकेकडून सातत्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू असले तरीदेखील कोरोनावर नियंत्रण मिळविणे अवघड होत आहे. महापालिका आरोग्य प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना करत असले तरीदेखील दाट लोकवस्तीमध्ये कोरोनाचा झालेला शिरकाव ही मोठी समस्या बनली आहे. नाशिक शहरातील पंचवटी, जुने नाशिक, वडाळागाव, पखालरोड, नाशिकरोड या भागात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका हद्दीत रविवारी १०८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. महापालिका हद्दीतील कोरोना रूग्णांची संख्या आता १ हजार २०९ इतकी झाली आहे. एकूण ६२ लोकांचा मृत्यू अद्याप झाला आहे. ५०४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहे. ६४३ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत.रविवारीसुध्दा पंचवटी, जुने नाशिक, पखालरोड, नाशिकरोड या भागातील रुग्णसंख्या अधिक आहेत. जुन्या नाशकातील बुधवार पेठ, जोगवाडा, पिंजारघाट, कथडा, गंजमाळ, खडकाळी, द्वारका या भागात एकूण ९ रुग्ण मिळून आले. तसेच पखालरोडवरील गुलशन कॉलनी-३, रॉयल कॉलनी-१ पखालरोड-५ असे एकूण ९ रुग्ण या भागात मिळून आले आहे. वडाळागावात एक वर्षाचा मुलासह ७० वर्षीय वृध्द महिला तर वडाळ्यातील गणेशनगरमध्ये २० वर्षीय तरूण आणि मेहबुबनगर वसाहतीत ११ वर्षीय मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. वडाळागावात पुन्हा ४ नवे रुग्ण मिळाले.पंचवटीमधील फुलेनगर-१, हिरावाडी-१, बळी मंदिर परिसर-१, पंचवटी कारंजा-१, स्नेह नगर दिंडोरीरोड-२, दिंडोरीरोड-१, हनुमानवाडी-१ आणि टकलेनगर-३ असे ११ रूग्ण मिळाले. तर नाशिकरोड भागात जयभवानी रोड-१, गोसावीवाडी-१ असे दोन रूग्ण मिळाले. तसेच सातपूर भागातील मुळ सातपूरमध्ये १, श्रमिकनगर-२, टिळकवाडी-१ तर सिडकोमध्ये औदुंबर चौक-२, सिडको-२ असे एकूण ४९ रुगण हे रात्री साडेआठ वाजता प्राप्त अहवालानुसार पॉसिटिव्ह आले.*उर्वरित उपनगरनिहाय आकडेवारी लवकरच देत आहोत....----या भागातील रुग्ण मृत्यूमुखीकाठे गल्लीमधील ४५ वर्षीय महिला.बागवानपुऱ्यातील ७२ वर्षीय वृध्द महिला.फुलेनगर येथील ६५ वर्षीय वृध्द महिला.त्रिमुर्तीनगर मायको रुग्णालय परिसरातील ६५वर्षीय पुरूषकेतकीनगरमधील ६७ वर्षीय वृध्द व्यक्तीवृंदावन कॉलनी, पखालरोडवरील ७० वर्षीय वृध्द पुरूष. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू