चित्रकला स्पर्धेत साईनारायण गुरुकुलचा शंभर टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 17:48 IST2019-01-24T17:48:41+5:302019-01-24T17:48:59+5:30

सोनांबे : तालुक्यातील कोनांबे येथील श्री साईनारायण गुरूकुल विद्यालयाचा शासकीय ग्रेड चित्रकला स्पर्धेचा शंभर टक्के निकाल लागला. नुकत्याच झालेल्या ...

100% result of Sainarayan Gurukul in the painting competition | चित्रकला स्पर्धेत साईनारायण गुरुकुलचा शंभर टक्के निकाल

चित्रकला स्पर्धेत साईनारायण गुरुकुलचा शंभर टक्के निकाल

सोनांबे : तालुक्यातील कोनांबे येथील श्री साईनारायण गुरूकुल विद्यालयाचा शासकीय ग्रेड चित्रकला स्पर्धेचा शंभर टक्के निकाल लागला.
नुकत्याच झालेल्या शासकीस ग्रेड चित्रकला परीक्षा २०१८ मध्ये श्री साईनारायण गुरूकुल विद्यालयाच्या विद्यार्थ्यी १०० टक्के उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्यालयातील विद्यार्थीनी वैष्णवी कैलास पवार हीने ‘अ’ ग्रेड संपादन केली असून पवन नामदेव पवार व अशिकेष शिवाजी खेताडे हे विद्यार्थी ‘बी’ ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरीत आठ विद्यार्थ्यांना ‘सी’ ग्रेड प्राप्त झाली आहे. श्री साईनारायण गुरूकुल कोनांबे मधील विद्यार्थी हे नेहमीच विविध कलागुणांमध्ये आपले योगदान देऊन संस्थेचे नाव उंचावत असतात. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धामध्ये सहभागी व्हावे, आपल्या मेहनत व जीद्दीच्या जोरावर यश संपादन करावे. यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांनी समाजात नावलौकीक कमवावा असे आवाहन संस्थेच्या संचालक सौ. अपर्णा पवार यांनी केले.

Web Title: 100% result of Sainarayan Gurukul in the painting competition